कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 2047 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करताना तरुण आयएएस अधिकाऱ्यांना त्यांच्या नियत भूमिकेचे करून दिले स्मरण

Posted On: 17 JUL 2022 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जुलै 2022

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालय,कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, सेवानिवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अवकाश  राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज 2020 च्या तुकडीच्या युवा आयएएस अधिकार्‍यांना त्यांच्या संबंधित राज्य केडरला जाण्यापूर्वी त्यांना त्यांच्या नियत भूमिकेची आठवण करून दिली.

2047 साली जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी होतांना तुमचं वय तुमची जमेची बाजू असल्याने, फक्त तुम्हालाच ती संधी आणि विशेषाधिकार मिळेल, असे ते म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की नागरिक केन्द्री प्रशासनासाठी  अर्थवाही आदान-प्रदान  आणि प्रशासनामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. धोरण तयार करणे आणि धोरणांची अंमलबजावणी करणे या प्रक्रियेत आपले म्हणणे विचारात घेतले जावे अशी आजच्या नागरिकांची आकांक्षा आहे.  

डॉ जितेंद्र सिंह यांनी नमूद केले की केंद्रीय मंत्रालये किंवा केंद्रीय विभागांसमवेत सहाय्यक सचिवांसंदर्भातला हा अनिवार्य उपक्रम 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेला एक मोठा प्रयोग होता. यामुळे भारत सरकारला मोठा फायदा झाला आहे. ते म्हणाले की भारत सरकारच्या विविध मंत्रालय किंवा विभागांमधील विविध प्रमुख उपक्रमांमध्ये सुधारणा करण्यासाठी सहाय्यक सचिवांनी सहभागी होऊन त्यांचं मत नोंदवणे अपेक्षित आहे.  यामुळे त्यांना फक्त त्यांचे कौशल्य आणि प्रतिभा दाखविण्याची संधीचं मिळत नाही, तर भारताच्या पंतप्रधानांसमोर सादरीकरण करण्याची संधी देखील मिळते. ही संधी कदाचित त्यांच्या वरिष्ठांना मिळाली नसेल.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, 175 अधिकार्‍यांच्या या तुकडीत अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेले 108 अधिकारी आहेत आणि वैद्यकीय, व्यवस्थापन, कायदा आणि कला या विषयांची पार्श्वभूमी असलेले अनेक अधिकारीही आहेत.  त्यांनी यावर जोर दिला की त्यांनी त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा उपयोग करून त्यांच्या विभागात कशाप्रकारे नवकल्पना आणू शकतात, त्या नवीन कल्पनांचा वापर करू शकतात हा विचार करावा.

विविध मध्यस्थ आणि गळती पूर्णपणे काढून टाकून थेट उच्च दर्जाचे कार्य नागरिकांपर्यंत कसे पोहोचवू शकतात ह्याचाही विचार करावा असं ही डॉ.जितेंद्र सिंह यांनी या अधिकाऱ्यांना सांगितलं.

प्रशासन आणि प्रशासनाकडून नागरिकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा वाढत असताना माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट, मोबाईल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग इत्यादींमुळे लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येऊ शकतात.  लोकांशी थेट संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाला मदत करा,असा सल्ला ही  त्यांनी या तरुणांना दिला.

डॉ जितेंद्र सिंह यांनी या तरुण नोकरशहांना तर्कसंगत दृष्टीकोन  ठेवण्याचे आवाहन केले.सरकारी कार्यालयात  येणाऱ्या सामान्य नागरिकांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन सरकारी सेवांमधून नागरिकांच्या समाधानासाठी सर्वात महत्वाचा घटक ठरणार आहे,असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1842237) Visitor Counter : 103