सांस्कृतिक मंत्रालय
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातर्फे 16 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव- 22 वा भारत रंग महोत्सव, 2022 (स्वातंत्र्य विभाग)" या महोत्सवाचे आयोजन
भारतातील विविध शहरांमध्ये 30 नाटकांचे होणार सादरीकरण
Posted On:
14 JUL 2022 9:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2022
भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय, भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरी करत आहे. यानिमित्ताने, नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) अर्थात राष्ट्रीय नाट्य विद्यालय, "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - 22 वा भारत रंग महोत्सव, 2022 (स्वातंत्र्य विभाग)" हा उत्सव "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022 अंतर्गत" आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करत आहे.

राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक, प्रा. (डॉ.) रमेशचंद्र गौर, यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली की, या मालिकेअंतर्गत भारतातील विविध शहरांमध्ये 30 नाटकांचे सादरीकरण होणार आहे. नवी दिल्लीतील कमानी सभागृहात 16 जुलै 2022 रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर भुवनेश्वर, वाराणसी, अमृतसर, बेंगळुरू आणि मुंबई या देशातील अन्य 5 शहरांमध्ये या महोत्सवाचे आयोजन केले जाईल. 14 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम, येथे या महोत्सवाच्या सांगता सोहोळ्यात एक विशेष सादरीकरण होईल.
त्यांनी विशेषत्वाने नमूद केले की स्वातंत्र्य विभागांतर्गत, राष्ट्रीय नाट्य विद्यालय 25 जुलै रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या परिसरात कारगिल विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला एक विशेष नाटक, कारगिल एक नाट्यकथा आयोजित करेल. संरक्षण मंत्री आणि लष्करप्रमुखांना यावेळी आमंत्रित करण्यात आले आहे. 14 ऑगस्ट रोजी जवाहरलाल पटांगणात विशेष नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

नाटकांचे आयोजन करण्यात येणाऱ्या सर्व ठिकाणी प्रवेशासाठी ऑनलाइन बुकिंग व्यवस्थेबाबतची माहिती गौर यांनी दिली. www.nsd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश विनामूल्य असेल.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841596)