गृह मंत्रालय
तरंगा टेकडी-अंबाजी-अबू रोड या 2,798 कोटी रुपये खर्चाच्या नवीन रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार
भारतीय संस्कृतीतील प्राचीन तीर्थक्षेत्रांचे पुनरुज्जीवन आणि भाविकांना सुविधा देण्यासाठी नरेंद्र मोदी निरंतर कार्यरत
Posted On:
13 JUL 2022 6:39PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तरंगा टेकडी-अंबाजी-अबू रोड या 2,798 कोटी रुपये खर्चाच्या नवीन रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
ट्विट संदेशात अमित शहा म्हणाले की, “मोदीजी भारतीय संस्कृतीतील प्राचीन तीर्थक्षेत्रांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि भाविकांना सुविधा देण्यासाठी निरंतर कार्यरत आहेत. गुजरातसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. मोदीजींनी गुजरातमधील माता अंबाजी मंदिर आणि श्री अजितनाथ जैन मंदिर या दोन प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना रेल्वेने जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, या 116.65 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गामुळे येथे येणाऱ्या भाविकांसह स्थानिक लोकांची सोय होईल आणि या भागाच्या विकासाला आणखी चालना मिळेल. तरंगा टेकडी -अंबाजी-अबू रोड या 2,798 कोटी रुपये खर्चाच्या नवीन रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
या रेल्वे मार्गाद्वारे अंबाजी मंदिर आणि तरंगा टेकडीवरील प्रसिद्ध अजितनाथ जैन मंदिराशी संपर्क व्यवस्था सुधारल्याने देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना येथे येणे सुलभ होईल, शिवाय गुजरात आणि राजस्थानमधील धार्मिक पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल.
***
S.Kakade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841294)
Visitor Counter : 207