मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
22 वा राष्ट्रीय मत्स्य पालक दिन साजरा
Posted On:
10 JUL 2022 9:44PM by PIB Mumbai
हैद्राबाद येथील राष्ट्रीय मत्स्योत्पादन विकास मंडळात आज राष्ट्रीय मत्स्योत्पादन विकास मंडळ, केंद्रीय मत्स्योत्पादन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाने आज 22वा राष्ट्रीय मत्स्य पालक दिन हायब्रीड पद्धतीने साजरा केला.केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बल्यान आणि डॉ. एल. मुरुगन हे या कार्यक्रमाला आभासी पद्धतीने उपस्थित होते.
या कार्यक्रमात देशभरातील 1000 हून अधिक मत्स्य उत्पादक,मत्स्योत्पादन क्षेत्रातील उद्योजक आणि मच्छीमार, व्यावसायिक, अधिकारी आणि शास्त्रज्ञ सहभागी झाले. कार्यक्रमादरम्यान, देशांतर्गत मासळीचा वापर आणि शाश्वत उत्पादन यासंदर्भात माहिती देणाऱ्या 4 पोस्टर्सचे प्रकाशन करण्यात आले.

मत्स्यपालनाच्या माध्यमातून मत्स्य उत्पादनात क्षेत्रात आपला देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. विविध माशांच्या प्रजातींसाठी प्रजनन तंत्रज्ञानाच्या विकासाद्वारे आणि उपयुक्त माशांच्या प्रजातींच्या संवर्धनाद्वारे शास्त्रज्ञांनी दिलेल्या योगदानामुळे हे शक्य झाले आहे, असे ता कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले.
देशातील मच्छिमार आणि मत्स्योत्पादकांच्या फायद्यासाठी सरकार सर्वाधिक खर्चाची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही प्रमुख पथदर्शी योजना राबवत आहे, असे डॉ.संजीवकुमार बल्यान यांनी आपल्या भाषणात सांगितले. शेतकऱ्यांनी या योजनेचा उपयोग करून मत्स्य उत्पादन आणि उत्पादकता वाढवावी आणि आपली सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी , असे ते म्हणाले.

सुमारे 30 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतले 500 पेक्षा जास्त सहभागी गटांच्या माध्यमातून या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी झाले.

देशभरातील सर्व मच्छिमार, मत्स्यपालक आणि संबंधित भागधारकांसोबत दृढ ऐक्य दाखवून देण्यासाठी दरवर्षी 10 जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य पालक दिन साजरा केला जातो.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840641)
Visitor Counter : 242