सांस्कृतिक मंत्रालय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित दोन स्थळांना राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके म्हणून घोषित करण्याची राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची शिफारस
Posted On:
08 JUL 2022 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2022
भारतीय राज्यघटनेचे जनक आणि महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित दोन स्थळांना राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके म्हणून घोषित करण्याची शिफारस राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने केली आहे.
23 सप्टेंबर 1917 रोजी डॉ. आंबेडकरांनी जिथे अस्पृश्यता निर्मूलनाचा संकल्प केला होता ते वडोदरा येथील संकल्प भूमी वटवृक्ष परिसर स्थळ, राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करावे, अशी शिफारस राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने केली आहे. .हे ठिकाण शंभर वर्षांहून अधिक जुने आहे आणि डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेल्या सामाजिक सन्मानाच्या क्रांतीचे साक्षीदार आहे.
भीमराव रामजी आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण घेतले त्या महाराष्ट्रातील साताऱ्यामधील प्रताप राव भोसले हायस्कूलला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्याची शिफारसही राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने केली आहे.
या शाळेची नोंदवही अजूनही अभिमानाने एक विद्यार्थी म्हणून भीमराव यांच्या मराठीतून केलेल्या स्वाक्षऱ्या दर्शवते . सध्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या शाळेची दूरवस्था झाली आहे.
या शिफारशी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासमोर सादर केल्या आहेत.सामाजिक समरसता आणि समतेच्या क्षेत्रातील हा एक अमूल्य वारसा आहे आणि राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करून त्याचे जतन केले पाहिजे, असे राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे अध्यक्ष तरुण विजय यांनी सांगितले.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840236)
Visitor Counter : 227