कोळसा मंत्रालय
वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीदरम्यान खासगी आणि व्यावसायिक कोळसा खाणींतील उत्पादन 79% नी वाढून 27.7 दशलक्ष टनांवर पोहोचले
गेल्या वर्षी लिलाव झालेल्या दोन खाणींमधून 1.57 दशलक्ष टन कोळसाउत्पादन झाले
या वर्षी 12 नव्या खाणींतून कोळसा उत्पादन सुरु होईल अशी अपेक्षा
Posted On:
07 JUL 2022 6:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2022
केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या अखत्यारीतील अतिरिक्त सचिव आणि नामनिर्देशित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी 6 जुलै 2022 रोजी प्रकल्प प्रस्तावकांच्या उपस्थितीत देशातील कोळसा खाणींतून आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत झालेल्या कोळसा उत्पादनाचा आढावा घेतला. या पहिल्या तिमाहीत देशात 27.7 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले आणि हे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये याच कालावधीत झालेल्या 15.5 दशलक्ष टन कोळसा उत्पादनापेक्षा 79% अधिक आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात कोळसा उत्पादन झाल्याबद्दल कोळसा मंत्रालयाने खाण धारकांची प्रशंसा केली आहे आणि आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत 32 दशलक्ष टन कोळसा निर्मितीचे लक्ष्य नक्कीच साध्य होईल अशी आशा व्यक्त केली. वर्ष 2021 मध्ये व्यावसायिक लिलाव सुधारणांच्या अंतर्गत लोळाव करण्यात आलेल्या दोन खाणींमधून कोळसा उत्पादन सुरु झाले असून पहिल्या तिमाहीत त्या खाणींतून 1.57 दशलक्ष टन कोळसा उत्पादन झाले याचा देखील कौतुकाने निर्देश करण्यात आला.
सध्या, खासगी आणि व्यावसायिक मिळून एकूण 36 खाणी कोळसा उत्पादन करत असून या वर्षात अजून किमान 12 खाणींमध्ये कोळसा उत्पादन सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आणि या नव्या खाणी देशातील कोळशाची मागणी पूर्ण करण्यात लक्षणीय योगदान देतील.
तसेच प्रकल्प प्रस्तावकांनी केलेले प्रयत्न आणि त्यांच्यासमोरील आव्हाने देखील सामायिक केली. या समस्या सोडविण्यासाठी संपूर्ण पाठींबा देण्याचे आश्वासन केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
R.Aghor /S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839902)