संरक्षण मंत्रालय
परदेशी खरेदीसाठी वित्तीय सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीने तीन खाजगी क्षेत्रातील बँकांना संरक्षण मंत्रालयाची मान्यता
Posted On:
07 JUL 2022 2:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2022
वित्तीय सेवा विभागाकडून, खाजगी क्षेत्रातील बँकांचा सरकारी व्यवहारामध्ये सहभाग खुला करण्याच्या अनुषंगाने, संरक्षण मंत्रालयाने परदेशी खरेदीसाठी पतपत्र आणि थेट बँक हस्तांतरण व्यवहार प्रदान करण्यासाठी, एचडीएफसी बँक लि., आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक या तीन खाजगी बँकांना नियुक्त केले आहे. संरक्षण खात्यांच्या प्रधान नियंत्रकांनी नुकतेच नवी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या वतीने या तीन बँकांशी या संदर्भात सामंजस्य करार केले आहेत.
आतापर्यंत, संरक्षण मंत्रालयाला या सेवा प्रदान करण्यासाठी केवळ अधिकृत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनाच मान्यता होती. यासह आता प्रथमच तीन खाजगी बँकांना देखील संरक्षण मंत्रालयाद्वारे परदेशी खरेदीसाठी वित्तीय सेवा प्रदान करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मान्यता दिलेल्या बँकांना भांडवल आणि महसूल म्हणून प्रत्येकी 2000 कोटी रुपयांचे पतपत्र व्यवहार एका वर्षाच्या कालावधीसाठी समवर्ती आधारावर (भांडवल आणि महसूल या दोन्ही अंतर्गत प्रत्येक बँकेसाठी रु. 666 कोटी) केले जाऊ शकतात.
R.Aghor /S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839828)
Visitor Counter : 253