वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी पंतप्रधान गतिशक्ती योजनेचा घेतला आढावा
32 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी अधिकारप्राप्त सचिवांचे समूह; त्यापैकी 29 नेटवर्क नियोजन गट आणि तंत्रज्ञान सहाय्य विभाग; केंद्रीय आणि राज्य मंत्रालयांसाठीचे पोर्टल्स आता संपूर्णपणे कार्यरत
Posted On:
06 JUL 2022 9:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2022
पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत देशभरात पायाभूत सुविधा क्षेत्रातील अनेक योजनांची जलदगतीने अंमलबजावणी सुरू आहे. काही राज्यांनी सामाजिक क्षेत्रातल्या प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या आराखड्याचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान गतिशक्ती योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या बैठकीत, आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला, रेल्वे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवहार, कोळसा, पोलाद, खते, तंत्रज्ञान, ग्रामीण विकास अशा सर्व मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी आणि BISAG-N(भास्कराचार्य राष्ट्रीय अवकाश उपकरणे आणि भू-माहिती संस्था) चे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत, गतिशक्ती बृहद आराखडयाची घोषणा झाल्यापासून म्हणजे 13 ऑक्टोबर 2021 पासूनच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच, डेटाला पोर्टलशी जोडण्याविषयी यावेळी चर्चा झाली.
पंतप्रधान गतिशक्ती योजनेचा, कार्यक्षमतेत बदल घडवून आणणारा दृष्टीकोन असल्याने सरकार, विविध विभागांचे अडथळे दूर करून वापरकर्त्यांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध आहे, असे पीयूष गोयल म्हणाले. भारताच्या बहुआयामी पायाभूत सुविधा जाळ्याच्या निर्मितीची पायाभरणी करण्यासाठी राष्ट्रीय बृहद योजना आणि संस्थात्मक आराखडा यांचे अतिशय महत्त्व आहे.
या बैठकीत राज्यस्तरीय संस्थात्मक व्यवस्थेत झालेल्या प्रगतीची नोंद घेण्यात आली. 32 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात, सचिवांचे अधिकारप्राप्त गट कार्यरत आहेत. त्यापैकी 29 गटांनी आपले नेटवर्क नियोजन गट आणि तंत्रज्ञान मदत केंद्र देखील तयार केले आहेत, असे डीपीआयआयटी विभागाचे सचिव अनुराग जैन यांनी सांगितले.
S.Kulkarni /R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839697)
Visitor Counter : 197