गृह मंत्रालय
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वाहिली श्रद्धांजली
पूर्वी, जम्मू काश्मीर मध्ये जाण्यासाठी परवाना लागत असे, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘एक देश, एक विधान आणि एक निशान (ध्वज) साठी लढा देत, काश्मीरला भारताचा अविभाज्य घटक बनवण्यासाठी प्राणांची आहुती दिली
डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा लढा आणि बलिदानाचे आपण सगळे कायम ऋणी आहोत
सत्तेचा मूळ हेतू हा अधिकार गाजवणे हा नाही तर देशउभारणीसाठी समर्पित भावनेने कार्य करणे हा असतो यावर दृढविश्वास असलेले डॉ मुखर्जी एक वेगळे विचारवंत नेते होते
सांस्कृतिक राष्ट्रवादाचे त्यांचे तत्वज्ञान आणि भारताच्या मूळ संस्कृतीचा आधार घेऊन धोरणे आखण्याचे त्यांचे विचार आपल्यासाठी कायमच मार्गदर्शक
Posted On:
06 JUL 2022 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2022
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी अनेक ट्वीट्स मधून डॉ मुखर्जी यांचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. एकेकाळी भारतातून जम्मू काश्मीरला जाण्यासाठी परवाना लागत असे. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘एक देश, एक विधान आणि एक निशान (ध्वज) साठी लढा देत, काश्मीरला भारताचा अविभाज्य घटक बनवण्यासाठी प्राणांची आहुती दिली, असे गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. डॉ मुखर्जी यांचा लढा आणि त्यागाचा देश कायम ऋणी राहील, अशा भावना शाह यांनी व्यक्त केल्या.
सत्तेचा मूळ हेतू, अधिकार गाजवणे हा नसून, देशबांधणीच्या कार्यासाठी समर्पित भावनेने काम करणे हा आहे, असे मानणारे डॉ मुखर्जी हे एकमेवाद्वितीय नेते होते. सांस्कृतिक राष्ट्रवादाचे त्यांचे तत्वज्ञान आणि भारताच्या मूळ संस्कृतीचा आधार घेऊन धोरणे आखण्याचे त्यांचे विचार आपल्यासाठी कायम मार्गदर्शक ठरतील, असे शाह म्हणाले.
S.Kulkarni /R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839655)
Visitor Counter : 231