संरक्षण मंत्रालय

फ्रेंच विमान इंजिन निर्माती कंपनी सॅफ्रन ग्रुपच्या सीईओंनी घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्लीत भेट


भारतात कंपनीचे देखभाल आणि दुरुस्ती सुविधा केंद्र सुरू करण्याचा जाहीर केला मानस

Posted On: 05 JUL 2022 8:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जुलै 2022

 

फ्रेंच कंपनी सॅफ्रन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलिव्हीर आंद्रेस यांनी आज, म्हणजेच 5 जुलै 2022 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. सॅफ्रन ग्रुप ही अत्याधुनिक लढाऊ आणि नागरी सेवेतील विमानांची इंजिने तयार करणारी अग्रगण्य उपकरण निर्माती कंपनी आहे.

या बैठकीत सॅफ्रन ग्रुपच्या कार्यकारी अध्यक्षांनी, संरक्षण मंत्र्यांना त्यांच्या कंपनीच्या देखभाल, दुरुस्ती (MRO) सुविधा केंद्राची भारतात उभारणी करण्यासंदर्भात माहिती दिली. भारतीय आणि परदेशी व्यावसायिक विमान कंपन्या LEAP-1A & LEAP-1B ही इंजिने वापरतात, त्यांची देखभाल आणि दुरुस्ती या केंद्रात केली जाईल. हैदराबाद मध्ये 150 दशलक्ष डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक करुन स्थापन केल्या जाणाऱ्या या MRO सुविधा केंद्रामुळे 500-600 उच्च कुशल रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीला ह्या केंद्रात, वर्षाला 250 इंजिन्सची देखभाल आणि दुरुस्ती केली जाऊ शकेल.

ऑलिव्हीर आंद्रेस यांनी राजनाथ सिंह यांना सॅफ्रन लढाऊ विमाने इंजिन्स आणि सॅफ्रन इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हैदराबादमध्ये आणि सॅफ्रन -HAL एअरक्राफ्ट इंजिन्सचे बेंगळुरू येथे या आठवड्यात संयुक्त उपक्रम म्हणून उद्घाटन करण्याच्या त्यांच्या योजनेची माहिती दिली. सॅफ्रन विमान इंजिन कंपनी,  36 दशलक्ष युरोंच्या गुंतवणुकीसह आणि हैदराबाद SEZ मध्ये 10 एकर जमिनीवर प्रगत विमान इंजिनाचे सुटे भाग आणि घटक तयार करेल.

सॅफ्रन इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नागरी आणि लढाऊ विमानांसाठी हार्नेस तयार करेल. Safran आणि HAL मधील संयुक्त उपक्रम हेलिकॉप्टर इंजिनसह विमानाच्या इंजिनसाठी टणक पाइपिंग ची निर्मिती करेल. या  संयुक्त उपक्रमासाठी 160  उच्च कौशल्ये असलेले कर्मचारी नियुक्त केले जातील.

भारत सरकारच्या सध्याच्या धोरणानुसार, प्रगत जेट इंजिनांची सहनिर्मिती आणि ते एकत्रित विकसित करण्यासाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्याविषयी, कंपनीच्या दीर्घकालीन योजनेची रूपरेषा यावेळी आंद्रेस  यांनी सांगितली. तसेच, विमान इंजिन निर्मितीच्या पलीकडेही त्यांच्या कंपनीच्या असलेल्या क्षमतांची माहितीही त्यांनी  राजनाथ सिंह दिली.

भारत आणि फ्रांसदरम्यानच्या सामरिक संबंधाना भारत अतिशय महत्त्व देत असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. हैदराबादमधील नवीन सुविधा केंद्र आणि बेंगळुरूमधील संयुक्त उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानांच्या अनुषंगाने भारतात आणखी काही सहनिर्मिती प्रकल्प उभारले जावेत यासाठी त्यांनी सॅफ्रनला आमंत्रण दिले.

 

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1839405) Visitor Counter : 187


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu