भारतीय निवडणूक आयोग
राजपत्र अधिसूचना उपराष्ट्रपती निवडणूक, 2022
Posted On:
05 JUL 2022 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जुलै 2022
आज (5 जुलै 2022) भारतीय राजपत्रात प्रकाशित झालेल्या अधिसूचनेद्वारे, निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी खालील तारखा निश्चित केल्या आहेत:-
- 19 जुलै 2022 (मंगळवार), नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख;
- 20 जुलै 2022, (बुधवार), नामनिर्देशनपत्रांची छाननी;
- 22 जुलै 2022, (शुक्रवार), नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख; आणि
- 6 ऑगस्ट, 2022, (शनिवार), या दिवशी आवश्यकता भासल्यास मतदान घेतले जाईल.
आयोगाने 1 जुलै 2022 रोजी जारी केलेल्या स्वतंत्र अधिसूचनांद्वारे,उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे आणि सहसचिव पी.सी त्रिपाठी आणि लोकसभा सचिवालयाचे संचालक राजू श्रीवास्तव यांची सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक नियम, 1974 च्या नियम 3 अंतर्गत आवश्यकतेनुसार,निवडणूक अधिकाऱ्यांनी सार्वजनिक सूचनेद्वारे आज, 5 जुलै, 2022 रोजी अधिसूचित केले आहे की-
- नामनिर्देशनपत्र, उमेदवार किंवा त्याच्या प्रस्तावक किंवा अनुमोदकांपैकी कोणीही निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांच्या खोली क्रमांक 18, तळमजला, संसद भवन, नवी दिल्ली येथील कार्यालयात किंवा ते अपरिहार्य कारणामुळे गैरहजर असल्यास, सहाय्यक निवडणूक अधिकारी सहसचिव पी.सी त्रिपाठी आणि लोकसभा सचिवालयाचे संचालक राजू श्रीवास्तव यांच्याकडे सदर कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सादर करता येतील. मात्र 19 जुलै 2022 नंतर सादर करता येणार नाही.
- प्रत्येक नामनिर्देशनपत्रासोबत ज्या संसदीय मतदारसंघात उमेदवार मतदार म्हणून नोंदणीकृत आहे त्या मतदार यादीतील उमेदवाराशी संबंधित नोंदीची प्रमाणित प्रत असावी;
- प्रत्येक उमेदवाराने फक्त पंधरा हजार रुपये जमा करावेत किंवा जमा केले जाऊ शकतात .ही रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांकडे नामनिर्देशनपत्र सादर करताना रोख स्वरूपात किंवा आधी भारतीय रिझर्व्ह बँकेत किंवा सरकारी तिजोरीत जमा केली जाऊ शकते.आणि नंतर नामनिर्देशनपत्रासोबत ही रक्कम जमा केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे;
- नामनिर्देशन पत्राचे अर्ज वरील कार्यालयातून उपरोक्त वेळी प्राप्त होऊ शकतात;
- कायद्याच्या कलम 5बी च्या उप -कलम (4) अन्वये, नाकारण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्रां व्यतिरिक्त अन्य नामनिर्देशन पत्रांची छाननी , बुधवार, 20 जुलै, 2022 रोजी खोली क्रमांक 62, पहिला मजला, संसद भवन, नवी दिल्ली येथे सकाळी 11 वाजता केली जाईल.
- नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची नोटीस उमेदवाराद्वारे किंवा उमेदवाराने लिखित स्वरुपात अधिकृत केलेल्या त्याचा कोणताही एक प्रस्तावक किंवा अनुमोदकांद्वारे, परिच्छेद (I) मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांना 22 जुलै 2022 रोजी दुपारी तीन वाजे पर्यंत सादर करता येईल;
- निवडणूक लढवली जात असल्यास, शनिवार, 6 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 दरम्यान नियमानुसार निश्चित केलेल्या मतदानाच्या ठिकाणी मतदान घेतले जाईल.
या अधिसूचना आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकृत राजपत्रांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सार्वजनिक सूचना एकाचवेळी पुनर्प्रकाशित करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839404)
Visitor Counter : 221