ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसीने आर्थिक वर्ष 23 च्या पहिल्या तिमाहीत वीज निर्मितीमध्ये 21.7% पेक्षा जास्त वाढ नोंदवली
Posted On:
04 JUL 2022 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2022
एनटीपीसी समूह कंपन्यांनी एप्रिल ते जून 2022 या पहिल्या तिमाहीत 104.4 बीयू (अब्ज एकके) वीजनिर्मिती केली. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 85.8 बीयू वीज निर्मिती करण्यात आली होती. त्यात यंदा 21.7% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. जून 22 मध्ये, वीज उत्पादन 34.8 बीयू होते, जून 21 मधील 26.9 बीयू च्या तुलनेत ते 29.3% ने जास्त आहे. हे चालू वर्षात सुधारित कामगिरी आणि विजेच्या मागणीत वाढ दर्शवते.
कंपनीची एकूण स्थापित क्षमता 69,134.20 मेगावॅट असून त्यात 23 कोळसा आधारित, 7 वायू आधारित, 1 जल, 19 नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आहेत. संयुक्त उपक्रमाअंतर्गत अंतर्गत, एनटीपीसीकडे 9 कोळसा आधारित, 4 वायू आधारित, 8 जलविद्युत आणि 5 नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आहेत.
S.Kulkarni/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839159)
Visitor Counter : 199