दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

वायरलेस जॅमर, बूस्टरच्या योग्य वापरासंदर्भात दूरसंचार विभागाकडून जनतेसाठी मार्गदर्शक सूचना जारी


वायरलेस जॅमरची बेकायदेशीर सुविधा आणि विक्रीबाबत ई- वाणिज्य कंपन्यांना इशारा

Posted On: 04 JUL 2022 4:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जुलै 2022

 

वायरलेस जॅमर आणि बूस्टर/रिपीटर्सच्या योग्य वापराबाबत सामान्य जनतेसाठी, दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने 1 जुलै, 2022 रोजी मार्गदर्शक सूचना (https://dot.gov.in/spectrummanagement/advisory-proper-use-wireless-jammer-and-boosterrepeater). जारी केल्या आहेत.

भारत सरकारने दिलेल्या विशेष  परवानगीशिवाय  सेल्युलर सिग्नल जॅमर, जीपीएस ब्लॉकर किंवा इतर सिग्नल जॅमिंग उपकरणांचा  वापर सामान्यत: बेकायदेशीर आहे, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.  या संदर्भातील तपशीलवार मार्गदर्शक सूचना https://cabsec.gov.in/others/jammerpolicy/ येथे उपलब्ध आहेत.खाजगी क्षेत्रातील संस्था आणि/किंवा खाजगी व्यक्ती भारतात जॅमर खरेदी/वापरू शकत नाहीत.

वर नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांननुसार परवानगी घेतल्याशिवाय , भारतात सिग्नल जॅमिंग उपकरणांची जाहिरात करणे, विक्री करणे, वितरण करणे, आयात करणे किंवा अन्य  प्रकारे विपणन करणे   बेकायदेशीर आहेअसेही नमूद केले आहे.

सिग्नल बूस्टर/रिपीटरच्या संदर्भात असे नमूद केले आहे की, परवानाधारक दूरसंचार सेवा प्रदात्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती/संस्थेद्वारे मोबाईल सिग्नल रिपीटर/बूस्टर ठेवणे, विक्री करणे आणि/किंवा वापरणे बेकायदेशीर आहे.

तत्पूर्वी, 21 जानेवारी, 2022 रोजी जारी करण्यात आलेल्या सूचनेद्वारे (https://dot.gov.in/spectrummanagement/notice-e-commerce-companies-regard-illegal-facilitation-sale-signal-jammers), ऑनलाइन मंचावर वायरलेस जॅमरची विक्री किंवा विक्री सुविधा प्रदान करण्यासंदर्भात ई - वाणिज्य कंपन्यांना दूरसंचार विभागाने इशारा दिला आहे. उपरोक्त सूचनेची एक प्रत वाणिज्य मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ,सीबीआयसी / सीमाशुल्क यांना देखील योग्य कार्यवाहीसाठी  वितरित करण्यात आली आहे.  

 

 

 

 

S.Kulkarni/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1839124) Visitor Counter : 166