रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्ग -17 वरील गोवा/कर्नाटक सीमा ते कुंदापूर विभागापर्यंतचा चौपदरीकरण प्रकल्प डिसेंबर 2022 पर्यंत होणार पूर्ण
Posted On:
04 JUL 2022 11:38AM by PIB Mumbai
कर्नाटक राज्यातील राष्ट्रीय महामार्ग-17 वरील गोवा/कर्नाटक सीमा ते कुंदापूर विभागापर्यंतचा चौपदरीकरण प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट संदेशातून माहिती दिली की, सध्या 173 किमी (एकूण कामाच्या 92.42% काम पूर्ण झाले आहे) आणि रस्ते प्रकल्पावर वाहतूक सुरू असतानाच, उर्वरित प्रकल्प डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण केला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील सरकार देशाच्या कानाकोपऱ्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि नवीन भारताला 'कनेक्टिव्हिटीद्वारे समृद्धी' या युगाच्या दिशेने नेण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहे, असे मंत्री म्हणाले.
187 किमी लांबीच्या या रस्त्याच्या एका बाजूला अरबी समुद्र किनारा आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम घाट आहे, असे गडकरी म्हणाले. या विहंगम निसर्गरम्य देखाव्यामुळे, हा प्रकल्प पश्चिम आणि दक्षिण भारताला जोडणारा महत्त्वाचा किनारी महामार्ग आहे, असे त्यांनी सांगितले.
हा मोक्याचा महामार्ग विविध भूप्रदेशांमधून जातो आणि सुमारे 50% लांबीचा रस्ता चढउतार असलेला भूभाग (45 किमी) आणि (24 किमी) पर्वतीय भूभागामधून जातो, असे मंत्री म्हणाले.
प्रवाशांना जागतिक दर्जाच्या रस्ते पायाभूत सुविधांचा अनुभव देण्याच्या उद्देशाने, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, पणजी, मडगाव, कारवार, उडुपी, सुरतकल, मंगळूर कोझिकोड, कोची, तिरुवनंतपुरम, आणि कन्याकुमारी यासह प्रमुख शहरे आणि नगरांना जोडतो, असे त्यांनी सांगितले.
या महामार्गाच्या विकासामुळे नवीन व्यावसायिक आणि औद्योगिक आस्थापनांसाठी बहुविध संधींसह प्रकल्पाच्या प्रभावक्षेत्रात आर्थिक विकासाला नवी चालना देण्यात मदत झाली आहे, असे गडकरी यांनी सांगितले. यामुळे स्थानिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, अपघात टाळता येतील, वाहन परिचालनाचा खर्च अनुकूल होईल आणि गुळगुळीत रस्त्यामुळे इंधनाची बचत होईल तसेच राज्यांतर्गत आणि आंतरराज्य प्रवाशांची गर्दी कमी होईल, असे ते म्हणाले.
***
S.Thakur/S.Chavan/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839053)
Visitor Counter : 261