आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 197.98 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12-14 वर्षे वयोगटातील 3.69 कोटींहून अधिक किशोरवयीनांना लसीच्या मात्रा देण्यात आली

भारतात उपचाराधीन रुग्ण संख्या सध्या 1,13,864

गेल्या 24 तासात 16,135 नव्या रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.53%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.74%

Posted On: 04 JUL 2022 11:25AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 197.98 कोटींहून अधिक (1,97,98,21,197) मात्रांचा टप्पा पार केला. 2,58,55,578 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.

 

16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.69  कोटींहून अधिक (3,69,12,764) किशोरवयीन मुलांना कोविड -19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,09,125

2nd Dose

1,00,67,547

Precaution Dose

57,45,080

FLWs

1st Dose

1,84,24,461

2nd Dose

1,76,29,595

Precaution Dose

1,04,36,337

Age Group 12-14 years

1st Dose

3,69,12,764

2nd Dose

2,39,83,173

Age Group 15-18 years

1st Dose

6,05,19,574

2nd Dose

4,90,38,764

Age Group 18-44 years

1st Dose

55,83,57,087

2nd Dose

50,22,61,478

Precaution Dose

32,40,839

Age Group 45-59 years

1st Dose

20,34,65,296

2nd Dose

19,36,55,549

Precaution Dose

27,01,464

Over 60 years

1st Dose

12,72,78,124

2nd Dose

12,09,71,795

Precaution Dose

2,47,23,145

Precaution Dose

4,68,46,865

Total

1,97,98,21,197

 

 

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,13,864 इतकी आहे. हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.26% आहे.

 

परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.53% इतका आहे.  गेल्या 24 तासात 13,958 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून) 4,28,79,477 इतकी झाली आहे.

 

गेल्या 24 तासात 16,135 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

गेल्या 24 तासात एकूण 3,32,978 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.39 कोटींहून अधिक (86,39,99,907) चाचण्या केल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.74% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.85% नोंदविण्यात आला आहे.

 

***

ST/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1839038) Visitor Counter : 181