सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय स्मारके प्राधिकरण, महाराष्ट्रातील माहुली समूहातील मंदिरांच्या सर्वांगीण विकासाचा अहवाल  सांस्कृतिक मंत्रालयाला सादर करणार

Posted On: 03 JUL 2022 8:20PM by PIB Mumbai

 

साताऱ्याजवळच्या माहुली मंदिरांच्या सर्वसमावेशक विकासाचा अहवाल नॅशनल मॉन्युमेंट्स अथॉरिटी म्हणजेच राष्ट्रीय स्मारके प्राधिकरण (एनएमए)  सांस्कृतिक मंत्रालयाला सादर करणार आहे. मंदिरांचा हा प्रसिद्ध समूह - दक्षिण काशी या नावाने ओळखला जातो.  हेमाडपंथी शैलीतील 11व्या आणि 12 व्या सामान्य युगातील पाच मंदिरांचा यात समावेश आहे.

माहुली (सातारा) येथील थोर मराठा राणी ताराबाई भोसले आणि राणी येसुबाई भोसले यांच्या समाधीची सद्यस्थिती पाहण्यासाठी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे अध्यक्ष तरुण विजय यांनी तिथे भेट दिली. त्यांच्यासोबत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतिहासकारही होते.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी महाराणी ताराबाईंचे योगदान आणि मुघलांना नमवण्यासाठी त्यांनी दाखवलेली धडाडी हा देशाचा अभिमानास्पद वारसा आहे. येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या स्मृती जपल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नाने शक्य होऊ शकते. या विषयाकडेमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तरुण विजय यांनी सांगितले.

तरुण विजय यांच्यासोबत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी गजानन मंडावरे आणि प्रसिद्ध मराठा इतिहासकार मोहन शेटे होते.

त्यांनी रामटेक मंदिर समूह, अंबाला गेट, सिंदूरी बावळी, मनसर बौद्ध स्तूप यांनाही भेट दिली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांना ही अधिकारी ह्या स्मृतिस्थळांच्या सर्वांगीण विकासाचा अहवाल सादर करणार असून कृष्णा नदीच्या काठावरील रामटेक आणि माहुली मंदिरांचा समूह केंद्रीय संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट करून महाराणी ताराबाई आणि येसुबाई यांच्या समाधींचा योग्य पद्धतीने विकास करण्यास मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

***

R.Aghor/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1838992) Visitor Counter : 269


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil