आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष्मान भारत पीएम-जेएवाय आणि आयुष्मान भारत डिजिटल अभियान (एबीडीएम) या योजनांच्या अंमलबजावणीतील प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी तसेच भविष्यातील मार्ग आखण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) महाराष्ट्रात, पुणे येथे पश्चिम विभागाची आढावा बैठक आयोजित केली


या बैठकीच्या आयोजनासोबतच, डॉक्टर्स दिनानिमित्त, आयुष्मान भारत पीएम-जेएवाय योजनेअंतर्गत उल्लेखनीय आणि अनुकरणीय कामगिरी करणाऱ्या सुमारे 1000 डॉक्टरांचा गौरव देखील करण्यात आला

Posted On: 02 JUL 2022 2:17PM by PIB Mumbai

 

एनएचए अर्थात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने महाराष्ट्रात, पुणे येथे 30 जून आणि 1 जुलै 2022 रोजी आयुष्मान संगमया प्रादेशिक आढावा घेण्यासाठीच्या पश्चिम विभागाच्या पाचव्या बैठकीचे आयोजन केले होते. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान,दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांमधील एबी पीएम-जेएवाय अर्थात आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि एबीडीएम अर्थात आयुष्मान भारत डिजिटल अभियान या दोन योजनांशी संबंधित सरकारी अधिकारी, धोरणकर्ते तसेच विषय तज्ञांनी या बैठकीत भाग घेतला. एनएचएचे प्रमुख डॉ.आर.एस.शर्मा यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यक्रमात बोलताना डॉ.शर्मा यांनी एबी पीएम-जेएवाय योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पश्चिम विभागाने केलेले प्रयत्न आणि योगदानाची प्रशंसा केली.

दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमातील चर्चेतून, आयुष्मान भारत पीएम-जेएवाय तसेच एबीडीएमया दोन्ही योजनांनी पश्चिम विभागातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलेल्या प्रगतीचे मूल्यमापन सोपे होण्याच्या दृष्टीने संयुक्त विचार आदानप्रदान प्रक्रियेचा मार्ग प्रशस्त केला.

या बैठकीच्या आयोजनासोबतच, 1 जुलै 2022 रोजी, आयुष्मान भारत पीएम-जेएवाय योजनेअंतर्गत उल्लेखनीय आणि अनुकरणीय कामगिरी करणाऱ्या सुमारे 1000 डॉक्टरांच्या गौरव सोहोळ्याचे देखील आयोजन करण्यात आले.

भारताच्या कोविड महामारीविरुद्धच्या लढाईत तसेच लसीकरण अभियानाच्या अंमलबजावणीत डॉक्टरांनी बजावलेल्या भूमिकेवर एनएचएचे प्रमुख डॉ.आर.एस.शर्मा यांनी त्यांच्या बीजभाषणात अधिक भर दिला. पीएम-जेएवाय योजनेशी संबंधित असलेल्या वैद्यकीय समुदायाच्या प्रयत्नांना नियमितपणे पारितोषिके देऊन एक ओळख प्राप्त करून देण्याच्या  उद्देशाने एनएचएने खालील महत्त्वाच्या उपक्रमांची घोषणा केली आहे:

आयुष्मान भारत उत्कृष्ट चिकित्सक सन्मान: आयुष्मान भारत पीएम- जेएवाय परिसंस्थेअंतर्गत सर्वोत्तम कार्य करणाऱ्या पाच डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठीचा पुरस्कार

आयुष्मान भारत उत्कृष्ट चिकित्सालय सन्मान: आयुष्मान भारत पीएम- जेएवाय योजनेअंतर्गत सहभागी असलेल्या सर्व रुग्णालयांपैकी प्रत्येक राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एका रुग्णालयाला देण्यात येणारा पुरस्कार

आयुष्मान भारत पीएम- जेएवाय शिष्यवृत्ती: या अंतर्गत, आयुष्मान भारत पीएम- जेएवाय योजनेसंबंधी संशोधन कार्य हाती घेणाऱ्या जास्तीत जास्त पाच आरोग्यसुविधा व्यावसायिकांना एक वर्षासाठी शिष्यवृत्ती अनुदान देण्यात येईल.

सप्टेंबर 2022 मध्ये होणाऱ्या आयुष्मान भारत पीएम- जेएवाय योजनेच्या वर्धापन सोहोळ्यादरम्यान हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या बैठकीदरम्यान झालेल्या डॉक्टरांच्या सन्मान सोहळ्यामध्ये पीएम- जेएवाय योजनेची अंमलबजावणी करणारी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील राज्य आरोग्य विभागांचे अधिकारी तसेच डॉक्टर्स आभासी पद्धतीने सहभागी झाले आणि त्यातून समाजाप्रती डॉक्टरांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी अशाच प्रकारच्या गौरव सोहोळ्यांना उत्तेजन मिळाले.

पश्चिम विभागातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी एबी पीएम- जेएवाय योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना उपचार पुरविण्यासंदर्भात केलेल्या कामगिरीचा तपशील खाली दिला आहे:

State/UT of Western Region

Total Hospital Admission Count under AB PM-JAY

Pre-Auth Amount for treatment

DNH & DD

77,136

49.02 Cr

Goa

10,483

33.58 Cr

Gujarat

30,43,610

5522.15 Cr

Maharashtra

5,83,923

1516.96 Cr

Rajasthan

2,66,996

2985.50 Cr

 

***

S.Thakur/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1838813) Visitor Counter : 74