कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

ग्राम अभियंत्यांची पहिली तुकडी सरकारने केली प्रशिक्षित, इतर जिल्ह्यांमध्येही याची आवृत्ती राबवली जाणार


आत्मनिर्भर गावांद्वारे आत्मनिर्भर भारताचा मार्ग - राजीव चंद्रशेखर

Posted On: 30 JUN 2022 7:00PM by PIB Mumbai

 

आत्मनिर्भर भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा  प्रारंभ ग्रामीण युवकांच्या सक्षमीकरणापासून होतो. आत्मनिर्भर गावांद्वारे  आत्मनिर्भर भारताचा मार्ग आहे. स्थानिक पातळीवर रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याऱ्या संधी उपलब्ध करणे हा  नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा  दृढनिश्चयाचा विषय आहे, असे कौशल्य विकास आणि उद्योजकता, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान  राज्यमंत्री , राजीव चंद्रशेखर म्हणाले.  ग्रामीण उद्यमी या प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत आदिवासी युवक आणि ग्रामीण भागातील आदिवासींना  तांत्रिक प्रशिक्षण प्रदान करण्यात येत असून या प्रशिक्षणार्थींच्या पहिल्या तुकडीला आज भोपाळ मध्ये  राजभवन इथे चंद्रशेखर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राजीव चंद्रशेखर या कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001T8C1.jpg

आदिवासी समाजातील सुमारे 140 युवक  ग्राम अभियंते झाल्याबद्दल  या कार्यक्रमात त्यांना कौशल्य प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल उपस्थित होते. हा प्रशिक्षणार्थींच्या  "समृद्धीचा पासपोर्ट" आहे, असे सांगून कौशल्य प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आणि कौशल्य प्राप्त केल्याबद्दल त्यांनी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले.

या लाभार्थ्यांना विद्युत  आणि सौरऊर्जा, कृषी यांत्रिकीकरण, ई शासन, प्लंबिंग आणि इमारतीची रचना, दुचाकी दुरुस्ती आणि देखभाल या पाच विषयांमधील प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणामुळे या युवकांना स्वतःचा रोजगार सुरु करण्याच्या संधी प्राप्त होतील ज्यायोगे आणखी काही जणांना रोजगार मिळू शकेल. बहूआयामी  कौशल्य प्रदान करणे आणि बेरोजगार तरुणांना ग्राम अभियंता बनवण्याची संकल्पना ही अभिनव कल्पना असून  ती इतर जिल्ह्यांमध्येही राबवली जाईल.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि ओडिशा या 6 राज्यांमधून निवडलेल्या 17 जिल्ह्यांतील 17 क्लस्टरमधील सुमारे 250 लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी संसदीय संकुल योजनेअंतर्गत 13 मे  2022 रोजी  हा प्रायोगिक प्रकल्प, सुरु करण्यात आला.

स्थानिक पातळीवर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासह ग्रामीण युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी प्रदान करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार कौशल्य विकासाला प्राधान्य देत आहे.

***

N.Chitale/B.Sontakke/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1838303) Visitor Counter : 157


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil