संरक्षण मंत्रालय
मुंबई हाय क्षेत्रात पडलेल्या ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरमधून त्यातील कर्मचाऱ्यांची भारतीय तटरक्षक दलाने केली सुखरूप सुटका
Posted On:
28 JUN 2022 10:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2022
भारतीय तटरक्षक दलाने 28 जून 2022 रोजी मुंबई हाय भागात ओएनजीसीसाठी कार्यरत हेलिकॉप्टरमधून कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली. आयसीजी अंतर्गत सागरी मदत समन्वय केंद्राला -MRCC (मुंबई) ला एक संकटात सापडल्याचा एक संदेश मिळाला आणि तो मुंबई हायमध्ये ओएनजीसीसाठी नियुक्त केलेल्या पवन हंस हेलिकॉप्टरबाबत होता याचा शोध लागला. या हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिक आणि 7 कर्मचारी होते आणि तेलाच्या प्लॅटफॉर्मवर आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न करत असताना ते समुद्रात कोसळले.
सागरी मदत समन्वय केंद्राने MRCC (मुंबई) तातडीने शोध आणि बचावासाठी सर्व संबंधितांना सतर्क केले. भारतीय नौदलाकडे तातडीची मदत मागण्यात आली आणि त्यानुसार नेव्हल सीकिंग आणि एएलएच तैनात करण्यात आले. आव्हानात्मक हवामानात, ओएनजीसी जहाज OSV मालवीय-16 ला शोधून त्यातील चौघांची सुटका केली तर ओएनजीसी रिग सागर किरण यांच्या लाइफ बोटद्वारे 1 व्यक्तीची सुटका करण्यात आली. त्याचप्रमाणे, नेव्हल सीकिंग आणि ALH ने गंभीर अवस्थेत असलेल्या चौघांना बाहेर काढले आणि पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना जुहू हवाई तळावर नेण्यात आले. सर्व संबंधितांच्या समन्वित प्रयत्नांद्वारे 2 तासात बचाव कार्य पूर्ण करण्यात आले.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837762)
Visitor Counter : 148