इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

स्टार्टअप ही आत्ताची फॅशन नव्हे तर न्यू नार्मल आहे : राजीव चंद्रशेखर

Posted On: 27 JUN 2022 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2022 

 

“स्टार्टअप ही आत्ताची फॅशन नाही तर  न्यू नॉर्मल आहे. गेल्या आठ वर्षांपासून नरेंद्र मोदी सरकारने राबवलेली सक्रीय धोरणे आणि सुधारणा यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत  झालेल्या सखोल संरचनात्मक बदलांमुळे अस्तित्वात आलेले हे नवीन वास्तव आहे असे प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता या खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केले . “युवा भारतासाठी नवीन भारत : संधींची टेकएड” या विषयावर अहमदाबाद येथील निरमा विद्यापीठात त्यांनी दिलेल्या सादरीकरणाच्या वेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. 

नवउद्योजक, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी यांनी भरगच्च सभागृहात संवाद साधताना केंद्रीय राज्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या टेकएड च्या युगात भारत प्रवेश करत असताना युवा वर्गासाठी उपलब्ध असलेल्या संधींचा उल्लेख केला. कोविड-19 महामारीच्या दरम्यान झालेल्या वेगवान डिजिटलायझेशनचा उल्लेख करत त्यांनी सर्वसाधारणपणे भारतात आणि खास करून भारतातील तरुण वर्गासाठी कोविड महामारीने नवीन संधींची दारे खुली केल्याचे सांगितले.

जगातील सर्वाधिक वेगवान मोठी अर्थव्यवस्था अशी उपाधी मिळवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेने ज्या धडाकेबाज वाढीचा दर नोंदवला आहे त्याचाही त्यांनी उल्लेख केला. 100 युनिकॉर्न व 75,000 वर नोंदणीकृत स्टार्टअप्स असणारी जागतिक स्तरावर स्टार्टअप्सची तिसरी मोठी इकोसिस्टीम असणाऱ्या भारत अधोरेखित केला.

5 ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य समोर ठेवलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचे खरे चालक असा उल्लेख करत त्यांनी युवावर्गाला प्रोत्साहन दिले.


* * *

N.Chitale/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1837388) Visitor Counter : 144


Read this release in: Hindi , Kannada , Urdu , English