कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्यावसायिक खाणकामासाठीच्या कोळसा खाणींच्या लिलावासाठी, कोळसा मंत्रालयाकडे 38 बोली प्राप्त


ऑनलाईन लिलाव प्रक्रिया उद्या 28 जून 2022 पासून सुरु होणार

प्रविष्टि तिथि: 27 JUN 2022 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2022

 

कोळसा मंत्रालयाच्या नामनिर्देशित प्राधिकरणाने, 30 मार्च 2022 रोजी व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलाव प्रक्रियेचा पाचवा टप्पा, चौथ्या टप्प्याचा दुसरा  आणि तिसर्‍या टप्प्याचा दुसरा प्रयत्न सुरू केला आहे. सर्व कोळसा खाणींसाठी ऑनलाइन तांत्रिक बोली सादर करण्याची अंतिम तारीख 27 जून 2022 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि ऑफलाइन म्हणजेच बोलीसाठी प्रत्यक्ष आवेदने भरण्याची वेळ  27 जून 2022 रोजी दुपारी चारपर्यन्त होती.

व्यावसायिक कोळसा खाणी लिलावाच्या तीन टप्प्यांत ऑफलाइन पद्धतीने एकूण 38 बोली प्राप्त झाल्या आहेत. तर, लिलावाच्या पाचव्या टप्प्यांतर्गत, 15 कोळसा खाणींसाठी ऑफलाइन पद्धतीने एकूण 28  बोली प्राप्त झाल्या आहेत. यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक बोली आठ कोळसा खाणींसाठी प्राप्त झाल्या आहेत. तिसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या प्रयत्नांतर्गत, एकूण नऊ कोळसा खाणी लिलावासाठी खुल्या करण्यात आल्या आणि त्यापैकी  सहा  कोळसा खाणींसाठी सहा बोली प्राप्त झाल्या आहेत. चौथ्या टप्प्याच्या दुसऱ्या बोली प्रक्रियेअंतर्गत, एकूण चार कोळसा खाणी लिलावासाठी खुल्या ठेवण्यात आल्या आणि यात तीन  कोळसा खाणींसाठी चार बोली प्राप्त झाल्या आहेत.

लिलाव प्रक्रियेअंतर्गत प्राप्त झालेल्या ऑनलाइन बोली इच्छुक संभाव्य बोलीदारांच्या उपस्थितीत, उद्या म्हणजेच 28 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता टागोर चेंबर्स, स्कोप कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली - 110003  इथे उघडल्या जातील.


* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1837387) आगंतुक पटल : 202
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Odia , Kannada