विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        3D मुद्रण तंत्रज्ञानावर आधारित सूक्ष्म कणांचे आवरण असलेल्या (nanoparticle coating) N95 मास्कची निर्मिती
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                27 JUN 2022 7:53PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 27 जून 2022
 
संशोधकांनी 3D मुद्रण तंत्रज्ञान वापरून पुन्हा वापरता येण्याजोगे, पुनर्वापर करता येण्याजोगे, धुता येणारे, गंधहीन, गैर-अॅलर्जिक
आणि सूक्ष्मजीवविरोधी N95 मास्कची निर्मिती  केली आहे. या चार स्तर  असलेल्या मास्कचा  बाह्य स्तर  सिलिकॉनने तयार केला असून त्याच्या वापरावर अवलंबून असलेली त्याची आयुर्मर्यादा 5 वर्षांची आहे.
कोविड 19 सारख्या संसर्गापासून मानवाला संरक्षण देण्यासाठी हा मास्क सुपरिचित असला तरी सिमेंट कारखाना, वीटभट्ट्या, कापूस कारखाने आणि यासारख्या कारखान्यांमध्ये जिथे कामगारांना सतत धुळीच्या संपर्कात काम करावे लागते, अशा ठिकाणी या मास्कचा वापर करता येऊ शकेल. या मास्कचा वापर करताना आपल्या गरजेनुसार  ज्या ठिकाणी ते वापरले जाईल त्यानुसार फिल्टर बदलून त्यात बदल केले जाऊ शकतात.  यामुळे  सिलिकोसिस सारख्या फुफ्फुसाच्या गंभीर  आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते.  या मास्कचे नाव नॅनो ब्रेथ असून या मास्कसाठी ट्रेडमार्क आणि स्वामित्वहक्क दाखल करण्यात आला आहे.



मास्कमध्ये 4-स्तरीय फिल्टरेशन यंत्रणा प्रदान केली आहे ज्यामध्ये फिल्टरच्या बाह्य आणि पहिल्या थराला सूक्ष्म कणांचे आवरण आहे. दुसरा स्तर उच्चकार्यक्षमतेचा  फिल्टर आहे, तिसरा स्तर 100 µm फिल्टर आहे आणि चौथा स्तर आर्द्रता शोषक फिल्टर आहे.
 
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1837360)
                Visitor Counter : 242