रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नितीन गडकरी यांच्या हस्ते राजस्थानमध्ये 1357 कोटी रुपयांच्या 9 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

Posted On: 27 JUN 2022 4:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2022

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राजस्थानमध्ये 1357 कोटी रुपयांच्या 243 किमी लांबीच्या 9 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यातील राष्ट्रीय महामार्ग  -168A वरील सांचोरपासून निनावा भागाच्या रुंदीकरणामुळे चालौर जिल्ह्यातील ग्रॅनाइट उद्योगांचा व्यवसाय वाढेल तसेच शेतकऱ्यांना सुरतगड मंडीपर्यंत पोहोचणे सुलभ होईल.

ते म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग  -911 वरील श्रीगंगानगर ते रायसिंगनगर 2 पदरी मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग  -62 वरील सुरतगडपासून श्रीगंगानगर मजबुतीकरणामुळे आंतरराष्ट्रीय सीमा आणि  लष्करी तळापर्यंत दोन्ही बाजूनी पोहोचणे सोपे होईल, ज्यामुळे भारताची सामरिक ताकद देखील वाढेल.  सशस्त्र दलांना सीमावर्ती भागात उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल, नवीन रोजगार निर्माण होतील, आणि  राजस्थान प्रगती आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करेल असे ते म्हणाले.

गडकरी म्हणाले की सुरतगड शहरातील 4 पदरी उड्डाणपूलामुळे सुरक्षित आणि कोंडीमुक्त वाहतूक सुनिश्चित होईल. स्थानिक लोकांचे उत्पन्न वाढेल. आरओबीच्या बांधल्यामुळे लेव्हल क्रॉसिंगमधून सुटका होईल, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर  इतर प्रकल्प गुजरात आणि राजस्थानच्या पर्यटन स्थळांदरम्यान कनेक्टिव्हिटी सुलभ करतील असे ते म्हणाले.

या कार्यक्रमादरम्यान, राजस्थानमध्ये 5,000 कोटी रुपये खर्चून 25 नवीन बायपास बांधण्याची  घोषणा करण्यात आली. याशिवाय सेतुबंधन योजनेंतर्गत राज्य महामार्गांवर आरओबीसाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजस्थानसाठी सीआरआयएफ मध्ये 900 कोटी रुपये आणि सेतुबंधन योजनेत 700 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या प्रकल्पांमुळे इंधनाची बचत होईल, अपघात कमी होतील, औद्योगिक, कृषी, वाहतूक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1837302) Visitor Counter : 222