वस्त्रोद्योग मंत्रालय
तिरुप्पूरसारखी 75 वस्त्रोद्योग केंद्रे सुरू करण्याचे केंद्रसरकारचे उद्दिष्ट – पीयूष गोयल
10 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीसह येत्या पाच वर्षात वस्त्रोद्योग क्षेत्राची 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वृद्धीची क्षमता- पीयूष गोयल
Posted On:
26 JUN 2022 7:47PM by PIB Mumbai
केवळ कापड उत्पादनांच्या निर्यातीला समर्थन न देता, शाश्वत तंत्रज्ञानाचा समावेश सुनिश्चित करत, रोजगाराच्या मोठ्या संधी देखील निर्माण करतील अशी तिरुप्पूरसारखी 75 वस्त्रोद्योग केंद्रे भारत सरकारला निर्माण करायची आहेत, असे केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज तिरुप्पूर येथे एका कार्यक्रमात सांगितले.
गोयल म्हणाले की, तिरुप्पूरने देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे आणि येथे दरवर्षी 30,000 कोटी रुपयांच्या कापडाचे उत्पादन होत आहे.हे क्षेत्र 6 लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि 4 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळवून देत, एकत्रितपणे 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे,असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
गोयल म्हणाले की, संपूर्ण भारतामध्ये सुमारे 3.5 - 4 कोटी लोक केवळ वस्त्रोद्योग क्षेत्राच्या एकूण मूल्य साखळीत आहेत. वस्त्रोद्योग हा शेतीनंतरचा दुसरा सर्वात मोठा काम मिळवून देणारे क्षेत्र आहे.
कोविडच्या संदर्भात तसेच इतर देशांत चाललेल्या युद्धामुळे भारतासमोरील आव्हाने याबाबत त्यांनी चर्चा केली. तथापि, आव्हाने असूनही, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, यावर त्यांनी यावेळी बोलताना भर दिला.
गोयल म्हणाले की जर भारताचा, दर वर्षी चक्रवाढीच्या आधाराने 8% दराने विकास होत असेल तर सुमारे 9 वर्षांच्या कालावधीत अर्थव्यवस्था दुप्पट होऊन ती 6.5 ट्रिलियन डॉलर होईल.
नव्याने स्वाक्षरी केलेल्या मुक्त व्यापाराच्या संधींमुळे (FTAS) होणाऱ्या लाभांना अधोरेखित करत केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, आपल्या भाषणात म्हणाले, की या योजनांमुळे देशाला अनेक पटींनी विकास साधण्यास मदत होईल. लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी, पीएम गति शक्ती, राष्ट्रीय मास्टर प्लॅन सारख्या क्रांतिकारी उपायांमुळे पायाभूत सुविधांचे नियोजन सुधारण्यास आणि वेळेवर आणि वाजवी खर्चात प्रकल्पांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात मदत होईल.मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्कची स्थापना, कंटेनर उत्पादनावर लक्ष केंद्रित करणे, पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण फ्रेट कॉरिडॉर ही त्याच दिशेने टाकलेली पावले असल्याचे त्यांनी सांगितले.
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837158)
Visitor Counter : 199