आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण हॅकाथॉन मालिका आयोजित करणार


राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) प्रथमच सर्वांसाठी खुल्या हॅकाथॉन मालिकेचे आयोजन करणार आहे.

Posted On: 25 JUN 2022 9:36PM by PIB Mumbai

 

आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या (ABDM) परिसंस्थेमधील विविध मूलभूत घटकांच्या विकासाला चालना देण्याऱ्या नवोन्मेषी नवकल्पना शोधासाठी पहिली ओपन-टू-ऑल हॅकाथॉन मालिका आयोजित करणार आहे. या मालिकेची सुरुवात 14 ते 17 जुलै 2022 दरम्यान आयोजित, हॅकाथॉन- प्रथम फेरी: किकस्टार्टिंग युनिफाइड हेल्थ इंटरफेस (UHI)' ने होईल. ही हॅकाथॉन युनिफाइड हेल्थ इंटरफेस (UHI) वर भर देणारी असेल. भारतातील हेल्थ स्टार्ट-अप कार्यप्रणालीला चालना देणे तसेच या कार्यप्रणालीत येणाऱ्या अडचणींवर युनिफाईड डिजिटल इंटरफेस (UHI) च्या माध्यमातून उपाय विकसित करण्यासाठी व्यक्ती आणि संस्थांना एकत्र आणणे हा या हॅकाथॉनचा मुख्य उद्देश आहे.

ही हॅकाथॉन, जगभरातील नवोन्मेषकांना, डेटा तज्ञांना आणि विकासकांना युनिफाइड हेल्थ इंटरफेस ( UHI) च्या माध्यमातून डिजिटल आरोग्य सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी परस्पर सहकार्य करण्याची आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची उत्कृष्ट संधी प्रदान करेल.

हॅकाथॉन मालिकेची घोषणा करताना डॉ. आर.एस. शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण म्हणाले की, जगातील सर्वात कार्यक्षम सार्वजनिक वितरण प्रणालींपैकी काही प्रणाली भारताने विकसित केल्या आहेत. अनेक कप्पे मोडून काढत  विकसित करण्यात आलेले JAM आणि UPI यापैकीच आहेत. आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) आणि युनिफाइड हेल्थ इंटरफेस (UHI) हे हेल्थकेअर कार्यप्रणालीला सक्षम करतील. तसेच, ही हॅकाथॉन मालिका आरोग्य सेवेचे भवितव्य सुनिश्चित करण्याच्या उपाययोजनेत सहकार्य करण्यासाठी संबंधीताना सक्षम बनवेल. प्रत्येक भारतीयासाठी एक उत्तम आरोग्य परिसंस्था निर्माण करण्यात सहभागी होण्यासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात आले आहे

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) हॅकाथॉन मालिका - प्रथम फेरी: किकस्टार्टिंग युनिफाइड हेल्थ इंटरफेस (UHI) दोन प्रमुख संकल्पनांवर लक्ष केंद्रित करेल:

*'नवोन्मेष मार्ग, एकीकरण मार्ग'

किकस्टार्टिंग युनिफाइड हेल्थ इंटरफेस (UHI) साठीच्या प्रथम फेरीच्या बक्षीसांची अंदाजे रक्कम 60 लाख* रूपये असेल. वर नमूद केलेल्या संकल्पनेवर आधारित प्रत्येक आव्हानात्मक मार्गावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जाईल. इच्छुक सहभागींना https://abdm.gov.in/register  या संकेतस्थळावर नोंदणी करण्याची विनंती करण्यात आली आहे.

*बक्षिसांची ही रक्कम प्रयोगात्मक आहे; बक्षिसांची रक्कम कमी किंवा जास्त करण्याचा निर्णय पंच घेऊ शकतात.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) हॅकाथॉन मालिकेच्या पहिल्या फेरीनंतर 'हेल्थ क्लेम्स एक्सचेंज' (HCX) हॅकाथॉन होईल; या बाबतची विस्तृत माहिती आयुष्मान भारत डिजिटल मिशन ( ABDM) आणि युनिफाइड हेल्थ इंटरफेस (UHI) च्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

युनिफाइड हेल्थ इंटरफेस (UHI) बाबत अधिक माहिती संदर्भात आपण UHI सल्लामसलत लेखातील संपूर्ण मजकूर, तसेच UHI विषयावर आयोजित सार्वजनिक वेबिनारचे रेकॉर्डिंग पाहू शकता. ही माहिती ABDM च्या https://abdm.gov.in/publications  या संकेतस्थळावरून डाउनलोड देखील करता येईल.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1837011) Visitor Counter : 193