रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
भारत एनसीएपी अर्थात भारत नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमासाठी नियम
Posted On:
25 JUN 2022 11:53AM by PIB Mumbai
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 24 जून 2022 रोजी भारत एनसीएपी अर्थात नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाच्या संदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मध्ये 126E अंतर्गत काही नियमांचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, यामध्ये खालील गोष्टी सुचवण्यात आल्या आहेत.
(a) देशात उत्पादित किंवा आयात केलेल्या 3.5 टन पेक्षा कमी वजन असलेल्या M1 श्रेणीच्या मंजुरी प्राप्त मोटार वाहनांना [ प्रवाशांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी मोटार वाहने, ज्यामध्ये चालकाच्या आसना व्यतिरिक्त आठ जागा आहेत], ज्यामध्ये वाहन उद्योग मानके (Automotive Industry Standard (AIS)-197 नुसार. वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत आणि जागतिक मानक बेंचमार्कप्रमाणे या वाहनांची रचना केली आहे जी किमान नियामक आवश्यकतांपेक्षा अधिक आहे, अशा सर्व वाहनांना लागू असेल.
(b) भारत एनसीएपी रेटिंग, वाहनाचे मूल्यांकन करून ग्राहकांना मोटारीत बसणाऱ्यांसाठीच्या संरक्षणाच्या स्तराबाबत (a) प्रौढ प्रवासी संरक्षण (AOP) (b) बालक प्रवासी संरक्षण (COP) आणि (c) संरक्षण सहाय्यक तंत्रज्ञान (SAT) या क्षेत्रात आवश्यक संकेत देईल. वाहन उद्योग मानके (Automotive Industry Standard )197 नुसार घेतलेल्या विविध चाचण्यांच्या स्कोअरच्या आधारे वाहनाला एक ते पाच पर्यंतचे स्टार रेटिंग दिले जाईल.
हा मूल्यांकन कार्यक्रम प्रवासी गाडीच्या सुरक्षा रेटिंगची संकल्पना मांडतो आणि ग्राहकांना संपूर्ण माहितीच्या आधारे निर्णय घेण्यास सक्षम करतो . हे देशातील OEM -original equipment manufacturer अर्थात उपकरणांच्या मूळ उत्पादक कंपन्यां द्वारे उत्पादित केलेल्या वाहनाच्या निर्यात क्षमतेला प्रोत्साहन देईल आणि देशांतर्गत ग्राहकांचा या वाहनांवरील विश्वास वृद्धिंगत होईल. याशिवाय हा कार्यक्रम उत्पादकांना उच्च रेटिंग मिळविण्यासाठी प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान प्रदान करण्यास प्रोत्साहित करेल.
(c) या कार्यक्रमांअंतर्गत वाहनांच्या चाचण्या , केंद्रीय मोटार वाहन नियम, (CMVR )1989 च्या नियम 126 मध्ये नमूद केलेल्या आवश्यक पायाभूत सुविधांसह चाचणी एजन्सींमध्ये केल्या जातील.
(d) कार्यक्रम लागू होण्याची तारीख: १ एप्रिल २०२३.
सर्व भागधारकांकडून तीस दिवसांच्या कालावधीत मतं आणि सूचना मागवल्या आहेत.
***
Jaydevi PS /BS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836930)
Visitor Counter : 242