युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर उद्यापासून केवडिया येथे सुरू होणाऱ्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री आणि सचिवांशी संवाद साधणार
Posted On:
23 JUN 2022 7:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2022
केवडिया येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर हे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री आणि सचिवांशी संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी उद्घाटनप्रसंगी अनुराग ठाकूर यांचे बीजभाषण होईल.
परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनुराग ठाकूर म्हणाले की, केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हे विविधतेतील एकतेचे प्रतिक असून केवडिया येथील परिषदेत विविध राज्यांमधील मंत्री एकत्र येऊन खेळासाठी योग्य ती पावले कशी उचलता येतील यावर चर्चा करतील, जेणेकरून खेळाडू अधिक चांगली कामगिरी करू शकतील आणि देशाचा गौरव वाढवू शकतील. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर राहून नेतृत्व करत आहेत आणि खेळाडूंना मार्गदर्शन आणि पूर्ण पाठिंबा देत आहेत, ज्यामुळे खेळाडूंचे मनोबलही उंचावले आहे”, असेही ते म्हणाले.
परिषदेदरम्यान खेलो इंडिया योजनेचे विविध पैलू उदा. क्रीडांगणाचे जिओ-टॅगिंग, राज्यांमधील प्रशिक्षण केंद्रे/अकादमी, क्रीडा स्पर्धांद्वारे प्रतिभावान खेळाडू ओळखणे आणि विकास, महिला, दिव्यांग , आदिवासी आणि ग्रामीण भागात खेळांना प्रोत्साहन , स्थानिक खेळ आणि शिक्षणाचे महत्त्व आणि डोपिंगविरोधी जागरुकता, क्रीडा सहाय्यक व्यावसायिकांसाठी परिसंस्था तयार करणे यासह विविध मुद्यांवर चर्चा केली जाईल. विशेषत: अलीकडच्या काळात देशातला क्रीडा विकासाचा विस्तृत आढावाही सादर केला जाईल. युवा व्यवहार विभागाचे संपर्क कार्यक्रम आणि योजनांची विस्तृत माहिती आणि त्यासाठीचा भविष्यातील रूपरेषा यावर दुसऱ्या दिवशी चर्चा होईल.
S.Kulkarni/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836579)
Visitor Counter : 197