केंद्रीय लोकसेवा आयोग
सनदी सेवा (पूर्व) परीक्षा 2022 चे निकाल
Posted On:
22 JUN 2022 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2022
दिनांक 05/06/2022 रोजी घेतलेल्या सनदी सेवा परीक्षा (पूर्वपरीक्षा ) 2022 निकाल जाहीर झाले असून, खालील यादीतील उमेदवारांनी ही सनदी सेवा मुख्य परीक्षा 2022,मध्ये प्रवेश करण्यासाठीची अर्हता प्राप्त केली आहे.
या उमेदवारांची ही निवड प्राथमिक/तात्पुरत्या स्वरूपाची आहे. परीक्षेच्या नियमावलीनुसार, या सर्व उमेदवारांना सनदी सेवा (मुख्य) परीक्षा 2022 साठी पुन्हा सविस्तर अर्ज करावा लागणार आहे. यासाठीचे नमूना पत्र DAF-I भरण्याची तारीख संकेतस्थळावर लवकरच जाहीर केली जाईल.
सनदी सेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये मिळालेले गुण, कट ऑफ आणि उत्तरे सनदी सेवा परीक्षा 2022 ची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि त्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतरच आयोगाचे संकेतस्थळ https://upsc.gov.in वर आपलोड केले जातील.
संघ लोक सेवा आयोग, धौलपुर हाऊस, शाहजहां रोड, नई दिल्ली या परिसरात, परीक्षा सभागृहाच्या बाजूला सुविधा केंद्र उपलब्ध आहे. वरील परीक्षेबद्दल, उमेदवारांना काहीही शंका असल्यास, ते स्वतः अथवा दूरध्वनी क्रमांक 011-23385271, 011-23098543 किंवा 011-23381125 वर कार्यालयीन वेळेत विचारू शकतात.
उमेदवारांची यादी बघण्यासाठी इथे क्लिक करावे
S.Kulkarni/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836296)
Visitor Counter : 209