मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ. एल मुरूगन पुदुचेरीतील आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभागी

Posted On: 21 JUN 2022 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जून 2022

 

केंद्र  सरकार आज आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहे. आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन आझादी का अमृत महोत्सव वर्षात येत असल्याने, भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील 75 महत्वाच्या  ठिकाणी तसेच जगभरातील परदेशी 75 स्थळांवर विविध दूतावासांनी ‘गार्डियन रिंग’ या कल्पनेसह योग दिन साजरा केला. 8 व्या योग दिनाची मुख्य कल्पना मानवतेसाठी योग ही आहे.

सामूहिक योगाचा मुख्य कार्यक्रम कर्नाटकातील म्हैसूर येथे म्हैसूर राजवाडा परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. तेथूनच त्यांनी आज विविध ठिकाणच्या योगा कार्यक्रमांना दूरदृष्य प्रणालीद्वारे संबोधित केले.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन तसेच माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरूगन यानी गांधी थिदल, पुदुचेरी येथील आंतरराष्ट्रीय योगा दिन कार्यक्रमात सहभाग घेतला. डॉ. मुरूगन यांनी आरोग्यसंपन्न शरीर आणि मनासाठी  योगाच्या महत्वावर प्रकाश टाकला.

दोन वर्षे कोविड-19 महासाथीनंतर, देशाने 2022 या वर्षीच्या  8  व्या आंतरराष्ट्रीय योग दिनी, मानवतेसाठी योगा या संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी व्यापक समर्थन आणि उत्साह पाहिला. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनी, गार्डियन रिंग  संकल्पनेचा समावेश असून उगवत्या सूर्याबरोबर 16  वेगवेगळ्या विभागांमध्ये लोक योग प्रात्यक्षिके करताना थेट दाखवण्याचा कार्यक्रम यात समाविष्ट आहे.

 

N.Chitale/U.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1835882) Visitor Counter : 129