आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 196.32 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 3.58 कोटींपेक्षा जास्त मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 79,313

गेल्या 24 तासात 9923 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.61 %,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 2.67 %

Posted On: 21 JUN 2022 9:33AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 196.32 (1,96,32,43,003)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,53,58,263 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 3.58 (3,58,19,121) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10408349

2nd Dose

10056882

Precaution Dose

5541271

FLWs

1st Dose

18422159

2nd Dose

17613030

Precaution Dose

9666829

Age Group 12-14 years

1st Dose

35819121

2nd Dose

21296142

Age Group 15-18 years

1st Dose

60128335

2nd Dose

47832947

Age Group 18-44 years

1st Dose

557922551

2nd Dose

498173044

Precaution Dose

2087553

Age Group 45-59 years

1st Dose

203390274

2nd Dose

192725116

Precaution Dose

2125281

Over 60 years

1st Dose

127209000

2nd Dose

120333098

Precaution Dose

22492021

Precaution Dose

4,19,12,955

Total

1,96,32,43,003

 

भारतात उपचाराधीन रुग्णभार सध्या 79,313 इतका आहे, तो देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.18 % इतका आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.61% आहे.गेल्या 24 तासांत 7,293 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,27,15,193 झाली आहे.

गेल्या 24 तासात 9,923 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 3,88,641 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 85.85 (85,85,26,854)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.67% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.55% आहे.

***

NC/SS/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1835769) Visitor Counter : 159