युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय युवा केंद्र संघटन नवी परिवर्तनीय अग्निपथ योजना देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचवणार
Posted On:
17 JUN 2022 5:55PM by PIB Mumbai
नवीन परिवर्तनकारी सुधारणा ‘अग्निपथ योजने’ ची ठळक वैशिष्ट्ये अधोरेखित करण्यासाठी आणि तरुणांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी राष्ट्रीय युवा केंद्र संघटन (एनवायकेएस) मिशन मोडमध्ये देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचेल.
ही योजना युवकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलण्यासाठी, या संदर्भात युवा व्यवहार सचिव संजय कुमार यांनी 16 जून 2022 रोजी राष्ट्रीय युवा केंद्र संघटनचे (एनवायकेएस) प्रादेशिक संचालक, राज्य संचालक, उपसंचालक आणि जिल्हा युवा अधिकारी यांच्यासोबत एक बैठक घेतली.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये आणि इतर तपशीलांसह त्याचे फायदे या बैठकीत अधोरेखित करण्यात आले. राष्ट्रीय युवा केंद्र संघटन, त्यांच्या क्षेत्रीय अधिकार्यांच्या व्यतिरिक्त, सर्व तळागाळातील युवकांना युथ क्लब किंवा अन्य आणि इतर सर्व संबंधितांमध्ये सहभागी करून घेईल आणि ते या परिवर्तनीय योजनेची माहिती प्रसारित करण्यासाठी आणि मोठ्या संख्येने लोकांमध्ये विशेषत: 17.5 वर्षे ते 21वयोगटातील म्हणजेच संभाव्य उमेदवार असलेल्या तरुणांपर्यंत संदेश पोहोचवतील, यावर या बैठकीत भर देण्यात आला.
जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि रणनीतीचा एक भाग म्हणून, वैयक्तिक आणि समूह संपर्क,दूरध्वनी /व्हॉट्सअॅपद्वारे मोठ्या प्रमाणात संदेशवहन आणि समाजमाध्यम मंचाचा वापर, घरोघरी संपर्क आणि राष्ट्रीय युवा केंद्र संघटनच्या चालू कार्यक्रमांच्या मंचाचा वापर याचा व्यापक उपयोग करण्यासाठी केला जाईल.
राष्ट्रीय युवा केंद्र संघटनच्या तळागाळातील यंत्रणांना या पोहोच कार्यक्रमासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त युवा स्वयंसेवकांना एकत्रित येऊन हे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1834915)
Visitor Counter : 200