पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिनाचे आयोजन


पर्यावरणाविषयी जागरूक असलेली जीवनशैली लोकचळवळ बनण्याची गरज-पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव

Posted On: 17 JUN 2022 2:24PM by PIB Mumbai

 

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आज केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव य़ांच्या अध्यक्षतेखाली वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिनाचे आयोजन केले. भारत आणि जगभरातच सर्व पर्यावरणीय आणि आर्थिक चिंतेच्या मुद्यांमध्ये जमिनीची प्रमुख भूमिका समजून घेण्यासाठी व्यापक प्रमाणावर जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी मंत्रालयातर्फे हा दिन साजरा करण्यात येतो.

केंद्रीय मंत्र्यांनी वन व्यवस्थापन मंडळाचे भारतासाठी असलेले वन व्यवस्थापन मानक जारी केले. या भारत विशिष्ट, स्वेच्छेने तयार करण्यात आलेल्या वन व्यवस्थापन मानकामुळे विविध तत्वेनिकष आणि निर्देशांकांसाठी वनमालकांचे  तटस्थ संस्थांकड़ून ऑडिटिंग करण्यास जोरदार चालना मिळणार आहे. वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी आणि वनांच्या शाश्वततेसाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिने वन प्रमाणपत्र हे महत्वपूर्ण साधन आहे. एफएससी वन प्रमाणीकरण हे आत्मनिर्भर भारताची उद्दिष्टे आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे, सीबीडब्ल्यू, यूएनसीसीडी, यूएनएफसीसीसी आणि बॉन आव्हान यांच्याप्रति आमची वचनबद्धता साध्य करण्यासाठी देशाच्या प्रयत्नांना समर्थन देईल.

पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी  महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय आघाड्यांकडे जमिनीचा हास होत असल्याच्या मुद्दा मांडण्यात भारत  आघाडीवर राहिला आहे, यावर मंत्रिमहोदयांनी प्रकाश टाकला.

   

यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला एका शब्दातील मंत्र लाईफ म्हणजे पर्यावरणासाठी जीवनशैली याचा हवाला दिला. आमच्या सध्याच्या जीवनशैलीमधल्या आवडींचे आम्ही सर्वांनी परीक्षण केले पाहिजे, अशी टिप्पणी त्यानी केली. अविचारी आणि विघातक उपभोगापेक्षा विचारपूर्वक आणि  पूर्ण मनन करून उपयोग यांची आज गरज आहे आणि त्यासाठी पर्यावरणीय दृष्ट्या जागरूक जीवनशैली ही लोकचळवळ  झाली पाहिजे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

कृषी क्षेत्रात कामासाठी ग्रामीण बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त उपयोग करण्यावर आणि जमीन सुधारणेवर त्यांनी जोर दिला. जमिनीचा हास थांबवून तिचा पुन्हा कस सुधारण्याच्या कामात गुंतलेल्या इतर 8 मंत्रालयांशी समन्वयाने काम करण्याची सूचना त्यांनी केली. जमीन व्यवस्थापनात महिलांच्या भूमिकेवर मंत्रिमहोदयांनी जोर दिला. वाळवंटीकरणाशी लढा हा मिशन पद्धतीने द्यायला हवा, असे त्यांनी शेवटी सांगितले.

***

S.Patil/U.Kulkarni/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1834909) Visitor Counter : 260