ग्रामीण विकास मंत्रालय
‘ग्रामीण उदयमिता संस्थान’अशा नावाने कार्यरत असलेल्या एक बनावट संस्थेकडून ग्रामविकास मंत्रालयाअंतर्गत काम करत असल्याचे भासवून उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा इथे खोटी भरतीप्रक्रिया सुरु
ही संस्था बनावट असून इच्छुक उमेदवारांकडून पैसे लुबाडण्याचा उद्योग
Posted On:
16 JUN 2022 5:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2022
‘ग्रामीण उद्यमिता संस्थान’ ह्या नावाने, एक बनावट संस्था कार्यरत असून आपण केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचा भाग म्हणून काम करत असल्याचा खोटा दावा ही संस्था करते, असे ग्रामविकास मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. एवढेच नाही, तर ही संस्था गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून डेटा विश्लेषक, प्रशासकीय अधिकारी आणि एमटीएस (शिपाई) पदांसाठी उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा ह्या राज्यांत भरती प्रक्रियाही करत आहे, असेही आढळले आहे.
मार्च 2022 मध्ये मंत्रालयालायासंदर्भात मिळलेल्या तक्रारींची दखल घेत, मंत्रालयाने असे स्पष्ट केले आहे की अशी कोणतीही संस्था/स्वायत्त संस्था/संलग्न किंवा अधीनस्थ कार्यालय/संस्था ग्रामीण विकास मंत्रालयाशी संलग्न नाही. या संस्थेची कार्यपद्धती आणि एकूण विश्वासार्हता तपासली असता, ही बनावट संस्था असल्याचे स्पष्ट होते केवळ इच्छुक अर्जदारांकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने ही संस्था तयार करण्यात आली आहे.
त्यामुळे, सर्वसामान्य जनतेला या संदर्भात दक्ष राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अर्जदारांनी या संशयास्पद संस्थेने केलेल्या रिक्त जागा/पद/ वेतनमान इत्यादी दाव्यांबाबत सावध राहावे आणि प्रमाणपत्र पडताळणी साठी सुरक्षा रकमेसह असे कोणतेही पैसे अथवा बँक खात्याच्या तपशीलांसह संवेदनशील माहिती या संस्थेला देऊ नये, असे आवाहन केले जात आहे.
नोकरीसाठी इच्छुक अर्जदारांनी कृपया हे ही लक्षात घ्यावे की केंद्र आणि राज्य सरकारची सर्व संकेतस्थळे “gov.in” डोमेनवर आहेत आणि “.com” किंवा इतर कोणत्याही स्पॅम/कन्कोक्टेड/स्पूफ वेबसाइट किंवा खोट्या लिंकवर ही संकेतस्थळे नाहीत.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1834574)
Visitor Counter : 204