आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा 195.50 कोटी मात्रांचा टप्पा पार


12-14 वर्षे वयोगटातल्या 3.53 कोटी पेक्षा जास्त किशोरांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतात उपचाराधीन रुग्ण संख्या सध्या 53,637

गेल्या 24 तासात 8,822 नव्या रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.66%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.35%

Posted On: 15 JUN 2022 9:29AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 195.50 कोटींचा टप्पा (1,95,50,87,271) पार केला आहे. 2,51,27,455 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.53 कोटींपेक्षा अधिक (3,53,38,654) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,07,923

2nd Dose

1,00,52,120

Precaution Dose

54,44,586

FLWs

1st Dose

1,84,21,011

2nd Dose

1,76,04,916

Precaution Dose

93,12,291

Age Group 12-14 years

1st Dose

3,53,38,654

2nd Dose

1,99,76,214

Age Group 15-18 years

1st Dose

5,99,40,200

2nd Dose

4,72,35,257

Age Group 18-44 years

1st Dose

55,77,26,544

2nd Dose

49,59,63,394

Precaution Dose

16,62,301

Age Group 45-59 years

1st Dose

20,33,57,943

2nd Dose

19,22,30,323

Precaution Dose

19,00,681

Over 60 years

1st Dose

12,71,80,902

2nd Dose

11,99,81,067

Precaution Dose

2,13,50,944

Precaution Dose

3,96,70,803

Total

1,95,50,87,271

 

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या 53,637 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.12% इतकी आहे.
 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.66% झाला आहे. गेल्या 24 तासात 5,718 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,26,67,088 झाली आहे.

 

गेल्या 24 तासात 8,822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

 

गेल्या 24 तासात एकूण 4,40,278 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 85.58 कोटींहून अधिक (85,58,71,030) चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.35% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.00% आहे.

***

NC/JW/CY

 


(Release ID: 1834157)