ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
पोषणमूल्ययुक्त तांदूळ कार्यक्रमांतर्गत, यावर्षी आवश्यक असलेल्या 175 एलएमटीपैकी आतापर्यंत 90 एलएमटी पोषणमूल्ययुक्त तांदूळ वितरणासाठी उत्पादित - केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे
Posted On:
13 JUN 2022 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जून 2022
पोषणमूल्ययुक्त तांदूळ कार्यक्रमांतर्गत, मार्च 2023 पर्यंत आकांक्षी आणि अधिक मागणी असलेल्या 291 जिल्ह्यांपर्यंत या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्याची योजना आखत आहे. एप्रिल 2022 मध्ये सुरू झालेल्या ‘सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (पीडीएस) पोषणमूल्ययुक्त तांदूळाचे वितरण’ च्या टप्पा II अंतर्गत, उत्पादनाशी संबंधित सर्व आव्हानांवर मात करून, 90 एलएमटी (लाख मेट्रिक टन) पोषणमूल्ययुक्त तांदूळ आधीच उत्पादित करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. टप्पा एक , टीडीपीएस (लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली) आणि ओडब्ल्यूएस (इतर कल्याणकारी योजना) यांचा समावेश असलेल्या,या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सर्व आकांक्षी आणि अधिक मागणी असलेल्या एकूण 291 जिल्ह्यांमध्ये, मार्च 2023 पर्यंत या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली जाईल.
पहिल्या टप्प्यात आयसीडीएस (एकात्मिक बाल विकास सेवा) आणि पीएम पोषण या योजनांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची व्याप्ती संपूर्ण भारतात मार्च, 2022 पर्यंत वाढवण्यात आली आणि सुमारे 17 लाख मेट्रिक टन पोषणमूल्ययुक्त तांदूळ वितरीत करण्यात आला. ‘सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत, 90 हून अधिक जिल्ह्यांनी (16 राज्यांमधील ) पोषणमूल्ययुक्त तांदूळ उचलण्यास सुरुवात केली आहे आणि आतापर्यंत सुमारे 2.58 लाख मेट्रिक टन तांदूळ वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती सचिवांनी दिली.
पोषण सुरक्षा प्रदान करण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेच्या अनुषंगाने,आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए ) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (एनएफएसए ), एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस ), प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पीएम पोषण [पूर्वीची मध्यान्ह भोजन योजना (एमडीएम)] आणि भारत सरकारच्या इतर कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत संपूर्ण लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणालीच्या (टीडीपीएस ) माध्यमातून 2024 पर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोषणमूल्ययुक्त तांदूळ पुरवण्यास मान्यता दिली आहे
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1833648)
Visitor Counter : 222