गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्राच्या (IN-SPACe ) मुख्यालयाचे उद्घाटन केले
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा देखील उपस्थित
Posted On:
10 JUN 2022 9:12PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्राच्या (IN-SPACe) मुख्यालयाचे उद्घाटन केले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते IN-SPACe च्या मुख्यालयाचे उद्घाटन झाल्यामुळे भारताने अंतराळ क्षेत्रात एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारत आणि इस्रोने अंतराळ क्षेत्रात आतापर्यंत जे यश संपादन केले आहे, ते प्रत्यक्षात उपयोगात आणत खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि स्टार्टअप्सनाही त्यात सहभागी करून घेतले जात आहे. अंतराळ क्षेत्रात उत्तुंग झेप घेण्यासाठी भारताने पुढे यावे अशी परिसंस्था निर्माण करण्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी मांडली होती, ज्याची सुरुवात अंतराळ क्षेत्रातल्या मोठ्या सुधारणांनी झाली. यामुळे भारतीय अंतराळ क्षेत्रात अपार संधी खुल्या होतील आणि भारतीय अंतराळ उद्योगही आपल्या अर्थव्यवस्थेत भरीव योगदान देईल.
21 व्या शतकातील भारत ज्या दृष्टीकोनासह पुढे मार्गक्रमण करत आहे आणि ज्या सुधारणा करत आहे, त्याचा मूळ आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतातील लोकांच्या क्षमतेवर असलेला अतूट विश्वास आहे, असे शाह म्हणाले. अंतराळ क्षेत्रात भारताला मोठ्या उंचीवर नेण्यासाठी हा कार्यक्रम एक मोठे पाऊल ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1833043)