कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
द्वितीय जिल्हा कौशल्य विकास नियोजन (DSDP) पुरस्कारांमध्ये कौशल्य विकासातील आदर्श नियोजनासाठी 30 जिल्ह्यांना पुरस्कार
देशभरातील 700 जिल्ह्यांपैकी 467 जिल्ह्यांनी जिल्हा कौशल्य विकास नियोजन पुरस्कार स्पर्धेत घेतला भाग
सहभागी जिल्ह्यांपैकी राजकोट, कछार आणि सातारा हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकांवर
Posted On:
09 JUN 2022 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2022
द्वितीय 'जिल्हा कौशल्य विकास नियोजन (DSDP) पुरस्कार आज नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे प्रदान करण्यात आले. यात 30 अग्रणी जिल्ह्यांना त्यांच्या प्रदेशातील कौशल्य विकासातील नाविन्यपूर्ण पद्धतींसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्व सहभागी जिल्ह्यांपैकी गुजरातमधील राजकोट, आसाममधील कछार आणि महाराष्ट्रातील सातारा हे जिल्हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर राहिले. 30 राज्यांतील जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी आणि इतर प्रतिनिधींनी पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी आपल्या कल्पना आणि अनुभव मांडले आणि आपापल्या जिल्ह्यातील तळागाळातील पातळीवरील कौशल्यविकास कामाचे सादरीकरण केले. दुसऱ्या टप्प्यावर तीस जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. या जिल्ह्यांना तीन श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले:
श्रेणी I: जिल्हा कौशल्य विकास नियोजनातील उत्कृष्टतेसाठी 8 पुरस्कार
श्रेणी II: जिल्हा कौशल्य विकास नियोजनातील उत्कृष्टतेसाठी 13 प्रमाणपत्रे
श्रेणी III: जिल्हा कौशल्य विकास नियोजनासाठी 9 प्रशंसापत्रे
एका संवादात्मक सत्रात, अधिकाऱ्यांनी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री, धर्मेंद्र प्रधान, आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची भेट घेतली आणि आपल्या कार्यक्षेत्रात अमलात आणलेल्या नाविन्यपूर्ण पद्धती आणि केलेल्या कामांची माहिती दिली.
धर्मेंद्र प्रधान यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी आणि इतर अधिकार्यांना कुशल कर्मचारीवर्गाचा मागणी आलेख काढण्यास आणि स्थानिक पातळीवर कौशल्य विकास उपक्रमांबद्दल जागरूकता मोहीम सुरू करण्यास सांगितले. कौशल्य ही जीवनभर चालणारी एक निरंतर प्रक्रिया आहे आणि जिल्हाधकाऱ्यांनी कल्पकतापूर्ण नियोजनाद्वारे कौशल्य विकास परिसंस्था बळकट करण्याच्या दिशेने कौशल्य विकासाची संपूर्ण परिसंस्था जिल्हा स्तरावर पुढे नेली पाहिजे आणि सातत्यपूर्ण कार्य केले पाहिजे,असे त्यांनी सांगितले.
बहु-कौशल्य संधींमुळे 'ग्राम अभियंत्याना' उत्तेजन मिळेल आणि उपजीविकेच्या संधींनाही चालना मिळेल,अशी सहायक कौशल्य परिसंस्था उभारण्याच्या केंद्र सरकारच्या उद्देशाचे प्रतिबिंब हे पुरस्कार आहेत, असे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले.
डीएसडीपी पुरस्कार हे ‘सूक्ष्म-अंमलबजावणीसाठी-समग्रतालक्ष्यी नियोजन’ या पंतप्रधानांच्या धोरणामधून मार्गदर्शन प्राप्त करत, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य विकास नियोजनाशी जिल्हा योजनांचे समन्वयन करण्यासाठी जिल्हा कौशल्य समित्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतात.
महाराष्ट्रातील सातारा येथे, जिल्हा कौशल्य समितीने कौशल्य बळकट करण्याच्या दृष्टीने आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले. कोविडच्या काळात प्रभावित झालेल्या महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांच्या सबलीकरणाची जबाबदारीही जिल्ह्याने घेतली आहे.
पुरस्कारविजेत्या जिल्ह्यांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
Ranking
|
State
|
District
|
1
|
Gujarat
|
Rajkot
|
2
|
Assam
|
Cachar
|
3
|
Maharashtra
|
Satara
|
4
|
Kerala
|
Malappuram
|
5
|
Uttarakhand
|
Rudraprayag
|
6
|
Maharashtra
|
Sindhudurg
|
7
|
Bihar
|
Gaya
|
8
|
Chattisgarh
|
Dantewada
|
9
|
Bihar
|
Araria
|
10
|
Uttar Pradesh
|
Bahraich
|
11
|
Himachal Pradesh
|
Mandi
|
12
|
Maharashtra
|
Washim
|
13
|
Gujarat
|
Patan
|
14
|
Uttarakhand
|
Bageshwar
|
15
|
Tamil Nadu
|
Tiruppur
|
16
|
Uttar Pradesh
|
Ghaziabad
|
17
|
Uttar Pradesh
|
Chandauli
|
18
|
Maharashtra
|
Thane
|
19
|
Madhya Pradesh
|
Singrauli
|
20
|
Chandigarh
|
Chandigarh
|
21
|
Chattisgarh
|
Mahasamund
|
22
|
Uttar Pradesh
|
Sonbhadra
|
23
|
Jharkhand
|
Giridih
|
24
|
Gujarat
|
Surendranagar
|
25
|
Karnataka
|
Raichur
|
26
|
Maharashtra
|
Solapur
|
27
|
Kerala
|
Thrissur
|
28
|
Andhra pradesh
|
Visakhapatnam
|
29
|
Andhra Pradesh
|
Prakasam
|
30
|
Haryana
|
Nuh (Mewat)
|
* * *
S.Kakade/S.Auti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1832744)
Visitor Counter : 202