भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम 2022 (16व्‍या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक)

Posted On: 09 JUN 2022 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जून 2022

 

राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ दि. 24 जुलै 2022 रोजी संपत आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 62 नुसार, विद्यमान राष्ट्रपतींच्या कार्यकाळाची  मुदत संपण्यापूर्वी  नवीन राष्‍ट्रपतींची निवड प्रकिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

राज्यघटनेतील कलम 324 सह राष्ट्रपती आणि उप-राष्ट्रपती निवडणूक कायदा, 1952 आणि राष्ट्रपती आणि उप-राष्ट्रपती निवडणूक नियम, 1974 नुसार निहीत केल्याप्रमाणे भारताच्या राष्ट्रपती कार्यालयासाठी होणा-या निवडणूक कार्यक्रमाची देखरेख, कार्यान्वयन  आणि नियंत्रण याविषयी प्रक्रि‍या भारतीय निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्‍यात आली आहे.  

(यासंबंधीच्या तपशीलासाठी कृपया येथे क्लिक करावे)

 

* * *

S.Kakade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1832730) Visitor Counter : 250