PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 08 JUN 2022 8:00PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 194.43 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 28,857
  • Active cases stand at 0.07%
  • Recovery Rate currently at 98.72%
  • 3,345 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
  • 4,26,36,710
  • 5,233 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (1.67%)
  • Weekly Positivity Rate (1.12%)
  • 85.35 cr Total Tests conducted so far; 3,13,361 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 8 जून 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार,भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 194.43 कोटींहून अधिक (1,94,43,26,416) मात्रांचा टप्पा पार केला. 2,48,41,726  लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे. 16 मार्च 2022 पासून  12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत,  3.46 कोटींहून अधिक  (3,46,80,050) किशोरवयीन मुलांना  कोविड -19 प्रतिबंधक लसीची  पहिली मात्रा देण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे  लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या  28,857 इतकी आहे.हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.07%आहे. परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा  दर 98.72% इतका आहे.  गेल्या 24 तासांत 3,345  कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून ) 4,26,36,710. इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 5,233  नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 3,13,361 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 85.35 कोटींहून अधिक (85,35,22,623) चाचण्या केल्या आहेत. देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.12% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  1.67%.नोंदविण्यात आला आहे.

 

इतर अपडेट्स :

  • राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप न वापरलेल्या 14.48 कोटींपेक्षा अधिक मात्रा शिल्लक आणि लसीकरणासाठी उपलब्ध आहेत.

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

* * *

R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1832356) Visitor Counter : 108