कंपनी व्यवहार मंत्रालय

नवी दिल्ली इथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यादरम्यान कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आयकॉनिक सप्ताहाचे निर्मला सीतारामन यांनी केले उद्घाटन

Posted On: 07 JUN 2022 6:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जून 2022

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यादरम्यान कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए) आयकॉनिक सप्ताहाचे केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज इथे उद्घाटन केले.

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग हे सन्माननीय अतिथी म्हणून समारंभाला उपस्थित होते.

एमसीएने गेल्या 8 वर्षात केलेल्या सुधारणांचा उल्लेख सीतारामन यांनी आपल्या भाषणात केला. नादारी आणि दिवाळखोरी संहिता (सुधारणा) लागू करणे, कंपनी कायदा 2013 आणि मर्यादित दायित्व भागीदारी कायदा, 2008 यांचा यात समावेश आहे.

“एमसीएला विशिष्ट स्वरुपात ठेवले आहे. कारण ते नियमन करताना लोकांना सुविधा देत आहे. सामान्य भारतीयांच्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. मग त्यांचा व्यवसाय छोटा असो किंवा ते मोठ्या व्यवसायाचा भाग असोत अथवा अगदी लहान गुंतवणूकदार असोत असे वित्तमंत्री म्हणाल्या.

     

“कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आव्हानांना तोंड देताना एमसीएने तत्परतेने विविध वेगवान पावले उचलली. त्यामुळे टाळेबंदीतही, लोक अनुपालनाची चिंता न करता त्यांचे व्यवसाय करू शकले,” असे सीतारामन यांनी नमूद केले.

“भारतातील किरकोळ गुंतवणूकदार बाजारात मोठ्या प्रमाणात आले आहेत.  ते आता धक्के शोषक (शॉक ऑब्जर्वर्स) म्हणून काम करत आहेत.  एफपीआय आणि एफआयआय निघून गेले, तरी आपल्या बाजारात विशिष्ट चढ-उतार दिसून आले नाहीत कारण लहान गुंतवणूकदार आले आहेत असे देशांतर्गत गुंतवणूकदारांबद्दल वित्तमंत्री म्हणाल्या.

    

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री राव इंद्रजित सिंग यांनी आपल्या भाषणात, देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सतत विकसित होत असलेल्या कॉर्पोरेट परिदृश्याच्या पार्श्वभूमीवर, प्रतिसादात्मक प्रशासनाच्या गरजेवर भर दिला.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  समारंभाच्या स्मरणार्थ, सीतारामन यांनी कॉर्पोरेट प्रशासनावर आधारित लघुपटाचे लोकार्पण केले. आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकदार जागरुकता यावर एक स्मरणार्थ टपाल तिकीट; आणि सोहळा चिन्हांकित करण्यासाठी आयबीसी "दिवाळखोरी - आता आणि त्या पलीकडे" याचे प्रकाशन केले. आयईपीएफ प्राधिकरणाकडून परतावा मिळवण्याकरता 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष खिडकी सुविधाही त्यांनी सुरू केली.

    

वित्तमंत्र्यांनी गुंतवणूकदारांसाठीची शपथही एका लघु चित्रफीतीद्वारे जारी केली. ती राष्ट्रीय कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) एक्सचेंज पोर्टलच्या उद्घाटनासह संपूर्ण भारतात 75 ठिकाणी एकाच वेळी पाहिली गेली. 

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालया अंतर्गत विविध संस्था आणि संस्थांनी या प्रसंगी आयोजित केलेल्या प्रदर्शनात त्यांनी पूर्णत्वास नेलेली कामे प्रदर्शित केली.

 

* * *

S.Kane/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1831871) Visitor Counter : 166