संरक्षण मंत्रालय
अग्नी-4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पडली
Posted On:
06 JUN 2022 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2022
ओदिशा येथील ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून आज 06 जून 2022 रोजी संध्याकाळी सुमारे साडेसात वाजता, अग्नी-4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची यशस्वी सुरुवात करण्यात आली. सुरक्षा दलांच्या धोरणात्मक आज्ञावलीअंतर्गत घेण्यात येणाऱ्या नियमित वापरकर्त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून ही यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीमुळे, क्षेपणास्त्राच्या सर्व परिचालनविषयक परिमाणांचे तसेच या प्रणालीच्या विश्वासार्हतेचे देखील प्रमाणीकरण झाले. या यशस्वी चाचणीनंतर ‘विश्वासार्ह किमान प्रतिबंधात्मक’क्षमता बाळगण्याच्या भारताच्या धोरणाला पुन्हा एकदा बळकटी मिळाली आहे.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831665)
Visitor Counter : 283