आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेच्या (पीएम -जेएआय ) सार्वजनिक डॅशबोर्डमध्ये नवीन वैशिष्ट्यांसह सुधारणा


हा डॅशबोर्ड वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जनतेसाठी एक स्रोत म्हणून काम करेल आणि पीएम -जेएआयचे भागधारक योजनेच्या प्रगतीचे सर्वसमावेशक चित्र दर्शवतात

Posted On: 06 JUN 2022 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जून 2022

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए ) आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबी पीएम -जेएवाय ) या त्यांच्या पथदर्शी योजनेअंतर्गत नवीन सुधारित आणि गतिमान सार्वजनिक डॅशबोर्ड जारी करण्याची घोषणा केली आहे.जो पीएम -जेएवाय  योजनेच्या  अंमलबजावणी विस्तृत माहिती प्रदान करतो.

हा डॅशबोर्ड हे पीएम -जेएवाय  योजनेच्या विकासाच्या अनुषंगाने आणखी एक पाऊल आहे.जे राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या दृष्टिकोनाच्या  योजनेच्या प्रगतीबद्दल पारदर्शक दृश्यमानता  प्रदान करते.यात एक परस्परसंवादी इंटरफेस आहे जो माहितीपूर्ण तक्त्याद्वारे योजनेबद्दल प्रमुख कामगिरी निर्देशक प्रदर्शित करतो.दैनंदिन आधारावर योजनेची कामगिरी समजून घेण्यासाठी सार्वजनिक आणि पीएम -जेएवाय  कार्यक्षेत्रातील  हितसंबंधितांना सखोल ज्ञान प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

सार्वजनिक डॅशबोर्डमागील विचार स्पष्ट करताना, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. एस . शर्मा म्हणाले की, प्रत्यक्ष वेळेची  माहिती  आणि विश्लेषणाद्वारे योजनेच्या प्रगतीबद्दल मुख्य माहिती आणि ज्ञान प्रदान करणे आहे हे नव्याने सुधारित पीएम -जेएवाय सार्वजनिक डॅशबोर्डचे उद्दिष्ट आहे. दीर्घकाळात डेटा-आधारित  आणि पुराव्यावर आधारित धोरण तयार करण्यात हे मदत करेल आणि सार्वजनिक क्षेत्रातील अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला प्रोत्साहन देईल.हे किमान शासन आणि कमाल जास्तीत जास्त प्रशासन सुनिश्चित करण्याच्या भारत सरकारच्या ध्येयाशी संरेखित आहे.

नवीन अद्यतनित केलेला डॅशबोर्ड राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर तयार केलेल्या आयुष्मान भारत कार्डांची संख्या, संलग्नकृत रुग्णालये आणि अधिकृत रुग्णालयातील प्रवेशांबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करतो.हा डॅशबोर्ड  वापरकर्त्यांना लिंग आणि वयानुसार वितरीत केलेली माहिती आणखी जाणून  घेण्यासाठी परवानगी देतो. उदा., ‘आयुष्मान कार्ड्स निर्मित ’ पॅनेल अंतर्गत ‘वयोगट’ श्रेणीमध्ये, वर्तुळाकार तक्ता  दाखवतो की, आयुष्मान कार्डधारकांची सर्वाधिक संख्या 30 ते 44 वयोगटातील आहे तर 15 ते 29 वर्षे आणि 45-59 वर्षे वयोगटातील लोकांची संख्या यापेक्षा थोडी  कमी आहे.

हा डॅशबोर्ड कालावधी आणि  प्रकारांमधील मुख्य कल  देखील दर्शवितो,म्हणजे, एकतर शेवटचे 7 दिवस, 30 दिवस किंवा योजना सुरू झाल्यापासून एकत्रितपणे.उच्च  प्रक्रियांशी संबंधित   एक वैशिष्टय  आणि योजनेंतर्गत संलग्न केलेल्या रुग्णालयांमध्ये लाभार्थ्यांना मिळालेल्या लाभासंदार्भातील  वैशिष्ट्ये डॅशबोर्डमध्ये जोडण्यात आली आहे.  ही संकलित माहिती  अशा उपचारांची संख्या किंवा अशा प्रक्रियांवरील  अधिकृत रक्कम यांच्यासाठी  देखील महत्त्वाची  आहे.

हा डॅशबोर्ड वेबपृष्ठाच्या शीर्षस्थानी प्रदान केलेल्या ‘राज्य’ निवडण्याच्या पर्यायासह या सर्व श्रेणींसाठी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय डेटा प्रदर्शित करतो . वापरकर्ते भारतातील शेकडो जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या कोणत्याही संलग्न  रुग्णालयात या योजनेअंतर्गत उपचार घेत असलेल्या रुग्णांची यादी शोधू आणि पाहू शकतात.

आयुष्मान भारत पीएम -जेएवाय  अधिकृत संकेतस्थळावर  (https://pmjay.gov.in) किंवा थेट: एनएचए  | सेतू डॅशबोर्ड (pmjay.gov.in) या माध्यमातून सार्वजनिक डॅशबोर्ड पाहता येईल.  

 

 

 

 

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1831625) Visitor Counter : 161