राष्ट्रपती कार्यालय
भारताच्या राष्ट्रपतींची गोरखपूरमधील गीता प्रेसच्या शतकमोहोत्सवी समारंभाला उपस्थिती
आर्थिक चणचण असूनही जनतेला स्वस्त दरात धार्मिक पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्रपती कोविंद यांनी गीता प्रेसचे केले कौतुक
Posted On:
04 JUN 2022 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2022
भारताचे राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद आज (जून 4, 2022) गोरखपूर येथील गीता प्रेसच्या शतकमहोत्सवी समारंभाला उपस्थित राहिले आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
भारतामधील अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ज्ञान आपल्या प्रकाशनांमधून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कामात गीता प्रेसने महत्त्वाची भूमिका बजावल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. ज्या वेळी गीता मूळ स्वरुपात, योग्य अर्थासह कमी किमतीला सहज उपलब्ध नव्हती, त्यावेळी ती जनसामान्यांना उपलब्ध करून देणे हा गीता प्रेसच्या स्थापनेमागचा उद्देश होता, या गोष्टीचा त्यांनी विशेष उल्लेख केला. कोलकाता येथून सुरु झालेला हा छोटासा उपक्रम आता देशभर आपल्या कामासाठी प्रसिद्ध आहे ही गोष्ट अभिमानाची असल्याचं ते म्हणाले.
भगवद्गीते व्यतिरिक्त गीता प्रेसने रामायण, पुराणं, उपनिषदे. भक्त-चरित्र आणि अन्य पुस्तकं प्रकाशित केल्याचं ते म्हणाले. आतापर्यंत 70 कोटी पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित करून गीता प्रेसने विक्रम नोंदवला असून हिंदू धार्मिक पुस्तकं प्रकाशित करणारी ही जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था असल्याचं ते म्हणाले. आर्थिक चणचण असूनही जनतेला धार्मिक पुस्तकं कमी किमतीला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी गीता प्रेसचं कौतुक केलं.
गीता प्रेसच्या ‘कल्याण’ मासिकाला अध्यात्मिक दृष्टीकोनातून संग्रह करण्याजोगं साहित्य म्हणून मनाचं स्थान आहे. हे कदाचित गीता प्रेसचं सर्वात प्रसिद्ध आणि भारतामधील सर्वात जास्त वाचलं जाणारं धार्मिक मासिक असू शकेल असं राष्ट्रपती म्हणाले.
गीता प्रेसच्या सध्याच्या 1850 प्रकाशानांपैकी अंदाजे 760 प्रकाशनं संस्कृत आणि हिंदी मधील तर उरलेली गुजराती, मराठी, तेलुगु, बंगाली, ओरिया, तामिळ, कन्नडा, असामीस, मल्याळम, नेपाळी, उर्दू. पंजाबी आणि इंग्रजी या अन्य भाषांमध्ये आहेत, या गोष्टीचा राष्ट्रपतींनी विशेष उल्लेख केला. यामधून भारतीय संस्कृतीची विविधतेमधील एकता दिसून येते असं ते म्हणाले. पुर्वेपासुन पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भारतीय संस्कृतीचा धार्मिक आणि अध्यात्मिक पाया एकच आहे असं ते म्हणाले.
गीता प्रेसच्या परदेशामध्ये शाखा सुरु करण्याच्या योजनेचा उल्लेख करत राष्ट्रपती म्हणाले की यामधून जगाला भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा लाभ मिळेल. परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय जगाला आपल्या देशाशी जोडणारे भारतीय संस्कृतीचे दूत असतात, त्यामुळे गीता प्रेसने त्यांच्याशी चांगले संबध प्रस्थापित करावेत, असं आवाहन त्यांनी केलं.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831213)
Visitor Counter : 250