माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ब्राझीलमधील अनिम!अर्ते आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन महोत्सवाचे #MIFF2022 मधे होणार सादरीकरण

Posted On: 02 JUN 2022 6:49PM by PIB Mumbai

मुंबई, 2 जून 2022

 

अनिम! आर्ते (Anim!Arte) हा ब्राझीलमधील विद्यार्थी प्रेक्षकांवर केंद्रित असलेला आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन महोत्सव आहे. अ‍ॅनिमेशन संस्कृती समृद्ध करणे आणि ब्राझीलच्या अॅनिमेशन उद्योगात व्यावसायिक कलात्मक वाढीचे मार्ग तयार करणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.  अनिम! आर्ते (Anim!Arte) संपूर्ण जगातील बालके, तरुण आणि व्यावसायिकांना दृकश्राव्य निर्मितीच्या निर्मितीला प्रोत्साहन देते. ब्राझिलियन आणि परदेशी विद्यार्थ्यांमधील सांस्कृतिक आणि दृकश्राव्य देवाणघेवाणीच्या मालिकेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाचा एक भाग म्हणून, अनिम! आर्ते (Anim!Arte) इतर चित्रपट महोत्सवांच्या सहकार्याने जगभरातील अनेक शहरांमध्ये दाखवले जाते. 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही सहभागींना अनिम!आर्ते (Anim!Arte) आस्वाद घेता येणार आहे.  03 जून 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता RR-III, फिल्म्स डिव्हिजन संकुलात याचे विशेष सादरीकरण होणार आहे.

या विशेष विभागात ब्राझीलसह विविध देशांतील 11 चित्रपटांचा समावेश आहे.  पुरस्कार विजेते अॅनिमेशन चित्रपट निर्माते अलेक्झांड्रे जुरुएना यांनी या चित्रपटांची निवड केली आहे. 2001 पासून, त्यांनी सोळा Anim!Arte साठी निवड प्रक्रीयेचे काम केले आहे.  त्यांच्या पुरस्कार विजेत्या चित्रपटांमध्ये ‘गेट आऊट ऑफ द मड’, ‘जॅकेरे’ आणि ‘सप्लिका सीअरेन्स’ यांचा समावेश आहे.  चित्रपट निर्माते आणि क्युरेटर तहजीब खुराना #MIFF2022 मध्ये चित्रपट प्रदर्शित करतील.

 

चला तर मग अनिम! आर्ते विभागातील सिनेमांवर एक दृष्टीक्षेप टाकूया:

1.ओनली ए चाईल्ड 

संयुक्त राष्ट्रांच्या रिओ परिषदेत 1992 मध्ये बारा वर्षांच्या सेव्हर्न सुझुकीने  बोललेल्या शब्दांना अर्थपूर्ण प्रतिमा आणि शक्तिशाली अॅनिमेटेड रूपकांचा वापर करून हा चित्रपट दृश्य कवितेचा आकार आणि रंग देतो.  स्वित्झर्लंडमधील या चित्रपटाचे दिग्दर्शन सिमोन जियाम्पाओलो यांनी केले आहे.

 

2. व्हेन एव्हरीथिंग इज बॉर्न

पामेला पेरेग्रिनो दिग्दर्शित ब्राझीलमधील हा चित्रपट गोड पाण्याच्या, वसुंधरेचे पोषण करणाऱ्या आणि सर्व काही समृद्ध करणाऱ्या प्रजननक्षमतेच्या देवीची कथा सांगतो.


3. कास्टअवे

एक मुलगी आकाशात एकटी राहते. खालच्या जगापासून खूप दूर. ते तिला भयभीत करत राहते. एकेदिवशी अचानकच झालेल्या प्रवासाने तिच्या साऱ्या सवयी विस्कटतात. तिला तिच्याच (मर्यादांच्या) ढगांपासून दूर करतात. फ्रान्समधील या चित्रपटाचे दिग्दर्शन रेचेल बॉस्क-बिएर्न, व्हिन्सेंट कॅरेट, सायमन फॅब्री, मेरी गौथियर, मार्गो लोपेझ, लिओपोल्डिन पेर्डिक्स आणि फ्लोर-अ‍ॅन व्हिक्टर यांनी केले आहे.

 

4.म्याव ऑर नेव्हर

या भन्नाट संगितिकेत, एक अंतराळवीर जीवनाचा अर्थ शोधत आकाशगंगेचा प्रवास करते. मदतीसाठी उत्सुक असलेल्या, मात्र प्रत्येकवेळी काहीतरी गोंधळ घालून अडचण तयार करणाऱ्या अंतराळातील छोट्या पिल्लाचा तिला सामना करावा लागतो. या भारतीय चित्रपटाचे दिग्दर्शन नीरजा राज यांनी केले आहे.

 

5. पिओयू 

हा थ्रीडी चित्रपट एका लहान मुलाची कथा सांगतो. त्याला एका नवीन मित्राने आश्चर्याचा धक्का दिला आहे; अनाहूत पाहुणा त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा निर्णय घेतो. या ब्राझिलियन चित्रपटाचे दिग्दर्शन गॅब्रिएल सूझा यांनी केले आहे.

 

6. द मार्च ऑफ द मिसिंग

एक लोखंडी शहर भव्य सरकारी संचलनाचे आयोजन करते, जे तेथील नागरिकांच्या शांत जीवनात आनंद आणि सुख आणते.  दोन बाहेरचे निरीक्षक - पहिले एका उंच खिडकीतून आणि दुसरे कॅमेऱ्याच्या लेन्समधून - फक्त त्यांनाच लक्षात आले की निदर्शकांचा एक गट एका अन्यायकारक शोकांतिकेकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्य वाहनाचा मार्ग रोखत आहे.  मेक्सिकोचा हा चित्रपट मार्कोस अल्माडा रिवेरो यांनी दिग्दर्शित केला आहे.

 

7. विनर

हा चित्रपट युद्धाच्या वेळी प्रेमाने केलेला एक कला हल्ला सादर करतो.  स्लोव्हाकियातील हा चित्रपट सॅम्युअल कोवन यांनी दिग्दर्शित केला आहे.

 

8. ओरीकी

टेरेरीओच्या स्थानिक लोकांच्या मृत्यू, आजारपण आणि उपचाराची कविता हा चित्रपट मांडतो. यात, इकू (मृत्यू) जगभर भ्रमण करतो. मानवतेला बरे करण्यासाठी ओरीसास एक होतात. ब्राझीलमधील या चित्रपटाचे दिग्दर्शन पामेला पेरेग्रीनो यांनी केले आहे.

 

9.द ट्री हॅज बिन प्लानटेड

झाड लावण्याचा एक साधा आणि थेट उद्देश असतो. तिची सावली आणि सुगंध तसेच त्याच्या फांद्यांमध्ये आश्रय घेतलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आनंद घेता येतो. एक हुकूमशाही शासन तिच्या संमतीशिवाय कोणतीही कृती सहन करणार नाही.. अगदी सुंदर आणि उत्पादक कृतींच्या बाबतीतही.. सर्व कारणांच्या पलीकडे सत्ता टिकवून ठेवण्यासाठी. अर्जेंटिनाच्या आयरीन ब्लेईने यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

 

10. मुडा

हा चित्रपट एका लहान मुलीची कथा सांगतो. तिला बदल आवडत नाहीत पण तरीही तिला त्यांना सामोरे जावे लागते;  ती तिला वाटणाऱ्या भीतीचा सामना करते आणि नवीन संधी शोधते. ब्राझीलच्या इसाबेला पन्नाईने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

 

11. कवल

साशा स्टॅनिशिक दिग्दर्शित मॅसेडोनियाचा हा चित्रपट एका अशा मुलाची कथा सांगतो ज्याची उन्हाळ्यात त्याच्या आजी-आजोबांच्या घरी कवल आणि त्याच्या आवाजाच्या जादूशी गाठ पडते.


* * *

PIB MIFF Team | R.Aghor/V.Ghode/Darshana/MIFF-48

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1830574) Visitor Counter : 127


Read this release in: English , Urdu , Hindi