उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि सेनेगल यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण, युवाव्यवहार विषयक सहकार्य आणि अधिकाऱ्यांसाठी व्हिसा मुक्त व्यवस्था या क्षेत्रात तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी


विकासाच्या दिशेने सुरु असलेल्या सेनेगलच्या वाटचालीत एक विश्वासू भागीदार होण्याची भारताची वचनबद्धता

Posted On: 02 JUN 2022 3:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2022

 

तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू काल सेनेगल इथं पोहोचले. सेनेगलच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री आयसेटा टेले साल (Aissata Tall Sall ) यांनी त्यांचे डकार विमानतळावर स्वागत केले. भारतातर्फे सेनेगलला उच्चस्तरीय भेेेटीची  ही पहिलीच वेळ असून दोन्ही देशातल्या राजनैतिक संबंधांना यावर्षी 60वर्षे पूर्ण होत असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यात नायडू यांनी सेनेगलचे राष्ट्रपती मैकी साल यांच्याशी प्रतिनिधिमंडळ स्तरातवर चर्चा केली. सेनेगलच्या सामाजिक-आर्थिक विकासाला द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व प्रकारे संपूर्ण पाठिंबा देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची हमी नायडू यांनी दिली.

या चर्चे दरम्यान, दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. 1 जून 2022 रोजी डकारमध्ये उपराष्ट्रपती नायडू आणि सेनेगलच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ. भारती पवार आणि सेनेगलच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री, आयसेटा टेले साल (Aïssata Tall Sall) यांनी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आणि करारांची देवाणघेवाण केली. सेनेगल या राष्ट्राने आदर्श लोकशाही प्रस्थापित करून आफ्रिका खंडात एक उत्तम उदाहरण सादर केले आहे, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत, याबाबतीत सेनेगलचे कौतुक करत आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख नायडू यांनी केला. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता ही सामायिक मूल्य दोन्ही देशांमधील प्रगाढ आणि मैत्रीपूर्ण संबंधांचा आधार आहेत,असं ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे सदस्य झाल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी सेनेगलचे आभार मानले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि "एक सूर्य, एक जग आणि एक ग्रिड" या उपक्रमाअंतर्गत सेनेगल सोबत कार्य करायला भारत,उत्सुक आहे, असं त्यांनी सांगितलं.

 

 

G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 1830465) Visitor Counter : 207