वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

वार्षिक राष्ट्रीय उत्पन्न, 2021-22 चा हंगामी अंदाज आणि चौथ्या तिमाहीसाठी सकल देशांतर्गत उत्पादनाचा चौथ्या तिमाहीचा (जानेवारी-मार्च) अंदाज, 2021-22

Posted On: 31 MAY 2022 6:55PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO), सांख्यिकी मंत्रालय आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने वार्षिक राष्ट्रीय उत्पन्न, 2021-22 चा हंगामी अंदाज आणि चौथ्या तिमाहीसाठी सकल देशांतर्गत उत्पादनाचा चौथ्या तिमाहीचा (जानेवारी-मार्च) अंदाज, 2021-22   हे एका पत्रकाद्वारे  जारी केले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न, 2021-22 चा तात्पुरता अंदाज तसेच जानेवारी ते मार्च या तिमाहीतील जीडीपी चा तिमाहीचा अंदाज, 2021-22 यासह जीडीपी च्या खर्चाच्या घटकाचा स्थिर (2011-12) अंदाज आणि सध्याची किंमत राष्ट्रीय खात्यांच्या प्रकाशन दिनदर्शिकेसह एन एस ओ ने जारी केले आहेत. 

वार्षिक आणि त्रैमासिक मूळ किमतीवर आधारित जीव्हीए अंदाज वार्षिक उलाढालीनुसार दर वर्षी बदलत असतो. निवेदन क्रमांक 1 ते 8 मध्ये जीडीपी च्या खर्चाचे घटक आणि एकूण/निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न आणि 2019-20, 2020-21आणि 2021-22 या वर्षांचे दरडोई उत्पन्न स्थिर (2011-12) आणि सध्याच्या किमती दिल्या आहेत.

31.01.2022 रोजी जारी झालेल्या 2020-21 वर्षाच्या प्रथम सुधारित ₹135.58 लाख कोटी अंदाजाच्या तुलनेत वर्ष 2021-22 मधील स्थिर (2011-12) किमतीवर आधारित वास्तविक जीडीपी ₹ 147.36 लाख कोटी इतका राहण्याचा अंदाज आहे. वर्ष 2020-21 मधील 6.6 टक्क्यांच्या तुलनेत वर्ष 2021-22 मधील जीडीपी मधील वृद्धी 8.7 टक्के राहील असा अंदाज आहे. 

नाममात्र जीडीपी वर्ष 2020-21 मधील ₹198.01 कोटी रुपयांच्या तुलनेत वर्ष 2021-22 मध्ये ₹ 236.65 लाख कोटी रुपये राहील असा अंदाज आहे. यामधून 19.5 टक्के इतका वृद्धी दर दिसून येतो.

***

G.Chippalkatti/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829838) Visitor Counter : 174


Read this release in: English , Urdu , Hindi