आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 193.45 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.39 कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 17,883

गेल्या 24 तासात 2,338 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.61%

Posted On: 31 MAY 2022 9:36AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 193.45 (1,93,45,19,805) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,45,38,123 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.39 (3,39,15,068) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,06,971

2nd Dose

1,00,40,156

Precaution Dose

52,24,186

FLWs

1st Dose

1,84,19,230

2nd Dose

1,75,84,337

Precaution Dose

87,28,754

Age Group 12-14 years

1st Dose

3,39,15,068

2nd Dose

1,63,67,244

Age Group 15-18 years

1st Dose

5,94,73,034

2nd Dose

4,57,29,616

Age Group 18-44 years

1st Dose

55,71,50,684

2nd Dose

49,00,80,242

Precaution Dose

8,76,672

Age Group 45-59 years

1st Dose

20,32,50,201

2nd Dose

19,08,64,226

Precaution Dose

14,01,340

Over 60 years

1st Dose

12,70,90,018

2nd Dose

11,90,44,191

Precaution Dose

1,88,73,635

Precaution Dose

3,51,04,587

Total

1,93,45,19,805

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 17,883 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे.

 

गेल्या 24 तासात 2,134 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,26,15,574 झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,338 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 3,63,883  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 85.04 (85,04,41,292) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.61% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.64% आहे.

****

STupe/SKane/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829649) Visitor Counter : 122