इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

राष्ट्रीय एआय पोर्टल (INDIAai.gov.in) आपला दुसरा वर्धापन दिन साजरा करत आहे


‘एआय फॉर एव्हरीवन’या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले

‘भारताकडून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अवलंबामुळे तळागाळापर्यंत फायदा होत आहे हे आपण कसे सुनिश्चित करू शकतो’ या विषयावर अनौपचारिक चर्चासत्राचे आयोजन

Posted On: 30 MAY 2022 8:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2022


 

'नॅशनल एआय पोर्टल (https://indiaai.gov.in)' चा दुसरा वर्धापन दिन 30 मे 2022 रोजी साजरा केला जात आहे .नॅशनल एआय पोर्टल हा, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय ई-प्रशासन विभाग (एनजीडी) आणि नॅसकॉम यांचा संयुक्त उपक्रम आहे. भविष्यासाठी एआय-सुसज्ज मजबूत कृतीदल विकसित करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी एआयचा वापर करण्यासाठी ज्ञान निर्मितीमध्ये उत्कृष्टता आणि नेतृत्व उभारणीसाठी एक एकीकृत एआय परिसंस्था निर्माण करण्यावर पोर्टलचा भर आहे.

30 मे 2020 रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांच्या हस्ते हे पोर्टल सुरु करण्यात आले. उद्घाटन झाल्यापासून, पोर्टलला 1.2 दशलक्ष पेज व्ह्यू सह 4.5 लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी भेट दिली आहे. पोर्टलवर सध्या एआय संबंधी 1151 लेख, 701 बातम्या, 98 अहवाल, 95 केस स्टडी आणि 213 व्हिडिओंचे भांडार आहे. 121 सरकारी उपक्रम आणि 281 स्टार्टअप्सचे तपशील असलेला भारताच्या एआय परिसंस्थेवरील सर्वोत्कृष्ट डेटाबेसपैकी एक यात आहे.


G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1829580) Visitor Counter : 173


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi