माहिती आणि प्रसारण मंत्रालय
अॅनिमेशन फिल्म्स समाजाचा आवाज जास्त मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवण्याचे अतिशय ताकदवान माध्यम आहेतः देबजानी मुखर्जी
ईशान्येकडील चित्रपट निर्माते पैशापेक्षा चित्रपटांविषयीच्या प्रेमाचा विचार करतातः जेम्स खामेग्नबाम
‘इन्वेस्टिंग लाईफ’ हा माहितीपट अस्तित्व टिकवण्याविषयी आहेः वैशाली वसंत केंदळे
Posted On:
30 MAY 2022 7:35PM by PIB Mumbai
मुंबई, 30 मे 2022
कितीही दुर्लक्षित क्षेत्र असले तरी अॅनिमेशन फिल्म्स या समाजाचा आवाज अधिक जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे एक अतिशय उत्तम आणि ताकदवान माध्यम आहे, असे मत यंगून फिल्म स्कूल पॅकेजच्या क्युरेटर देबजानी मुखर्जी यांनी मिफ 2022 मध्ये व्यक्त केले. त्या आज 17व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित केलेल्या मिफ संवाद कार्यक्रमात बोलत होत्या. यामध्ये मेईराम- द फायरलाईन या उद्घाटनाच्या माहितीपटाचे दिग्दर्शक जेम्स खामेग्नबाम आणि इन्वेस्टिंग लाईफ या हिंदी माहितीपटाच्या दिग्दर्शिका वैशाली वसंत केंदळे या देखील सहभागी झाल्या होत्या.
पुरस्कार विजेत्या स्वतंत्र अॅनिमेशन चित्रपट निर्मात्या आणि लेखिका असलेल्या देबजानी मुखर्जी यांनी “लिंगभेद आधारित हिंसाचार” आणि “मैत्रीच्या कथा” या संकल्पनांतर्गत स्टुडंट फिल्म्सना मार्गदर्शन करण्यासाठी अंगिकृत केलेल्या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. “आम्ही समाजातील विविध सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केली. यापैकी कोणालाही कलेचा किंवा चित्रपट निर्मितीचा पूर्वीचा कसलाही अनुभव नव्हता. आम्ही अॅनिमेटेड माहितीपट बनवण्यासाठी दोन ते तीन महिने एकत्र काम केले. विद्यार्थ्यांनी समाजातील विविध योगदानकर्त्यांनी दिलेल्या माहितीचे ध्वनिमुद्रण केले आणि त्याचे रुपांतर ऍनिमेशन फिल्म्समध्ये करण्यात येत आहे.” असे त्या म्हणाल्या. मिफसारखे मंच अॅनिमेशन फिल्म्सचे अधिक चांगल्या प्रकारे मार्केटिंग आणि वितरण करण्यासाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास देबजानी यांनी व्यक्त केला.
ईशान्येकडील चित्रपट निर्मात्यांना या क्षेत्राविषयी कमालीचे प्रेम आहे, त्यामुळे या क्षेत्रात नफा कमावण्याऐवजी या प्रेमाचा विचार त्यांच्या मनात असतो, असे ‘मेईराम- द फायरलाईन’ या उद्घाटनाच्या माहितीपटाचे दिग्दर्शक जेम्स खामेग्नबाम यांनी या संवादात सांगितले.“ हा माहितीपट पर्यावरणाविषयी असल्याने मला तो चित्रित करण्यासाठी खूप जास्त वेळ लागला. याची निर्मिती करण्यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च झाले. पण त्यातून मला कोणताही आर्थिक लाभ झाला नाही. मला खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय, प्रशंसा होत आहे पण पैसे नाही”, असे सांगत त्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली.
मोईरांगथेम लोईया या फिल्ममधील नायकाने दिलेल्या संदेशाची आठवण करून देत जेम्स खामेग्नबाम यांनी सांगितले की मानवाच्या निसर्गाकडून असलेल्या अपेक्षांचा कधी अंत होणार नाही आणि हे थांबलेच पाहिजे. एका पत्रकारापासून चित्रपट निर्मात्यापर्यंत त्यांचे रुपांतरण कसे झाले याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
इन्वेस्टिंग लाईफ या हिंदी माहितीपटाच्या दिग्दर्शिका वैशाली वसंत केंदळे यांनी आपल्या माहितीपटाविषयी सांगितले की मानवासहित सर्व प्रजातींचे अस्तित्व टिकवण्याविषयीचा हा माहितीपट आहे. कारणांचा शोध घेण्यापेक्षा अनपेक्षित विपरित परिस्थितीनंतर आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर भाष्य करणे हा या माहितीपटाचा मुख्य उद्देश आहे, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या भागातील तीन सामान्य व्यक्तींच्या आयुष्याचा वेध या फिल्ममध्ये घेतला आहे, ज्यांनी आपल्यासारखी मानव जमात, प्राणी आणि पर्यावरणाचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकहाती दररोज काम केले आहे. ‘इन्वेस्टिंग लाईफ’ चे नायक माजिद लोखंडे आणि राघवेंद्र नांदे हे देखील यावेळी उपस्थित होते.
* * *
PIB MIFF Team | R.Aghor/S.Patil/Darshana/MIFF-21
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829559)
Visitor Counter : 220