संसदीय कामकाज मंत्रालय
संसदीय कामकाज मंत्रालयाने आझादी का अमृत महोत्सव (AKAM) निमित्त आठवडाभर चालणाऱ्या आयकॉनिक सोहळ्यांतर्गत ‘युवा संसदेचे व्हिडिओ-ट्यूटोरियल’प्रदर्शित केले
Posted On:
30 MAY 2022 7:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मे 2022
‘युवा संसदेचे व्हिडिओ-ट्यूटोरियल आज संसद TV या वाहिनीवर प्रदर्शित झाले. अनेक प्रेक्षकांनी व्हिडिओ-ट्यूटोरियल पहिले. भिन्न विचारधारांच्या प्रति सहिष्णुता दर्शविणे, वादविवाद आणि चर्चा करून समस्या सोडवणे या युवा संसदेच्या उदात्त आदर्शांचा अंगीकार करण्यावर या ट्यूटोरियलमध्ये भर दिला आहे. आपल्या लोकशाहीची पाळंमुळं अधिक मजबूत करण्यासाठी विद्यार्थीवर्गात लोकशाहीच्या तत्वांचा प्रसार करण्यासह त्यांना संसदीय कार्यपद्धती आणि कामकाजाची अधिक माहिती करून देण्याचा उद्देश यामागे आहे. या ट्यूटोरियल मध्ये आझादी का अमृत महोत्सव विषयी संदेश आहे.
या ट्यूटोरियलचे पुनःप्रसारण संसद टीव्हीवर खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार केले जाईल:-
पहिले पुनःप्रसारण - 02.06.2022 रोजी दुपारी 2 वाजता
दुसरे पुनःप्रसारण - 05.06.2022 रोजी संध्याकाळी 6 वाजता
हे व्हिडिओ-ट्यूटोरियल मंत्रालयाच्या राष्ट्रीय युवा संसद योजनेच्या (NYPS) YouTube चॅनेलवर देखील उपलब्ध आहे आणि ते https://youtu.be/ut32HqVbHeg वर पाहता येईल.
G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829558)
Visitor Counter : 148